करटोली (कंटोली)भजी (kantolechi bhaji recipe in marathi)

Hema Wane
Hema Wane @hemawane_5557

#msr
#एक बहुगुणी रानभाजी.ही भाजी अत्यंत औषधी गुणधर्म असलेली आहे फक्त पावसाळ्यात म्हणजे जुन ते ऑगस्ट पर्यंत मिळते.चवीला रुचकर,प्रोटीनयुक्त,लोह असते नि कॅलरीज कमी म्हणून वजन कमी करण्यासाठी एकदम उत्तम. करटोल्यामधे फायटोकेमिकल्स असते ते शरीर निरोगी ठेवण्यासाठी मदत करते, अॅन्टीऑक्सिडंट असल्याने रक्त शुध्द करते त्यामुळे त्वचेच्या रोगापासून बचाव होण्यास मदत होते. पचनक्रीया सुधारण्यास मदत होते.अशी ही बहुगुणी भाजी आहे तरी आठवड्यात एकदा तरी खा.चला तर कशी करायची ते बघुयात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30/40 मिनिटे
3/4 सर्व्हिंग्ज
  1. 10/12करटोली
  2. चटणीसाठी 👇
  3. 1/2 कपनारळ
  4. 4 टेबलस्पूनकोथिंबीर
  5. 1 टीस्पूनलिंबाचा रस
  6. 2हिरव्या मिरच्या
  7. 1/2 टीस्पूनजीरे
  8. 1/2साखर
  9. 1/2 टीस्पूनमीठ
  10. बॅटर साठी👇
  11. 1 कपचण्याचे पीठ
  12. 1 चिमुटभरखायचा सोडा
  13. 1 टीस्पूनआललसुण मिरची पेस्ट
  14. 1 टीस्पूनमसाला
  15. 1/4 टीस्पूनहळद
  16. 1/2जीरेपुड
  17. 1 टेबलस्पूनचिरलेली कोथिंबीर
  18. 1/2 टीस्पूनमीठ
  19. तळण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

30/40 मिनिटे
  1. 1

    करटोली स्वच्छ धुवून घ्यावीत व खालील प्रमाणे चिरावी. आतल्या बिया काढून टाकाव्यात.

  2. 2

    वरील सर्व चटणीचे साहित्य एकत्र करून त्या अगदी कमी पाणी टाकून चटणी वाटून घ्यावी.

  3. 3

    आता चटणी खालीलप्रमाणे करटोल्यात भरावी.सगळी करटोली भरून घ्यावीत.

  4. 4

    चण्याच्या पीठामधे मीठ,आललसुण मिरची पेस्ट,खायचा सोडा,कोथिंबीर,मीठ,जीरेपुड घालून थोडे जाडसर पीठ भिजवावे.

  5. 5

    आता एका कढईत तेल तापत ठेवा. तापले कि भरलेली करटोली भजीच्या पीठात बुडवा नि भजी तळून घ्या.

  6. 6

    करटोल्याची खमंग,चटकदार भजी तयार आहे साॅस बरोबर छान लागतात.

  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Hema Wane
Hema Wane @hemawane_5557
रोजी

Similar Recipes