मूगडाळीची भजी (moongdalichi bhaji recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#gur
गणपती बाप्पांचे वाजत गाजत स्वागत झाले की दहा दिवस मग चढाओढ सुरु होते ती खिरापतींची आणि नैवेद्याची!माझी दोन्ही मुलं आमच्या सोसायटीच्या गणेशोत्सवात अगदी हिरीरीने आणि उत्साहाने भाग घेत असत.सोसायटी म्हणजे दुसरं घरंच.त्यामुळे भरपूर मित्र परिवार.गणेशोत्सवाच्या रुपरेषेपासून ते गणरायाचे विसर्जन होऊन सामुदायिक भोजन कार्यक्रम पूर्ण होईपर्यंत ही दोघं अखंड मंडळात रमलेली असत.त्यातच पुण्यातीलच "श्रीराम ढोल पथका"तही दरवर्षी ढोल वाजवायला जाणं हेही सुरुच असे.मानाच्या गणपतीच्या मिरवणुकीतही जावे लागे.रमणबाग शाळेत संध्याकाळी प्रँक्टीस चाले....थोडक्यात काय आमच्या घरातला,सोसायटीचा आणि पुण्यातल्या मानाच्या गणपतींची सरबराई आमच्या कडून होत असे.अगदी सळसळता उत्साह पहायला मिळे.शिवाय माझाही पाककृती स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा यात सहभाग असेच.एकदा चिरंजीवांनी आई मंडळातल्या खिरापतीला मूग भजी करून दे असं फर्मान काढलं...चांगली भरपूर दे🤔झालं...लागले तयारीला आणि या उत्साही कार्यकर्त्यांना मूग भज्यांची भली मोठी खिरापत करुन दिली...आता मुलांच्या नोकऱ्या आहेत त्यामुळे त्यांना जमत नाही...पण खिरापतीची आठवण मात्र सदैव ताजी आहे.
चला तर...तुम्हीही पुन्हा आस्वाद घ्या या मूगभज्यांचा!

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मि.
5व्यक्ती
  1. 2 वाट्यामूग डाळ
  2. 4-5हिरव्या तिखट मिरच्या
  3. 4-5आल्याचे काप
  4. 1/2 कपकोथिंबीर
  5. 2 लहानकांदे चिरुन (ऐच्छिक आहे.)
  6. 2 टेबलस्पूनधणे
  7. 2 टेबलस्पूनजीरे
  8. 4 टेबलस्पूनतांदळाची पीठी
  9. 1/2 टीस्पूनहळद
  10. 2-2.5 टीस्पूनमीठ
  11. 1/2 टीस्पूनहिंग
  12. तळण्यासाठी तेल जरुरीप्रमाणे

कुकिंग सूचना

30मि.
  1. 1

    स्वच्छ मुगाची डाळ घ्यावी.
    मुगाची डाळ धुवून घेऊन 3-4तास पाण्यात भिजवावी.लागणाऱ्या साहित्याची पूर्वतयारी करुन घ्यावी.

  2. 2

    3-4तासांनी डाळीतील पाणी काढून निथळावी.व अगदी बारीक वाटावी.वाटण्यापूर्वी वाटीभर भिजलेली डाळ बाजूला काढावी.ती भजी करताना आपल्याला पीठात घालायची आहे.भज्यांवर ही सबंध डाळ छान दिसते आणि लागते पण!

  3. 3

    धणे,जीरे,आले,मिरची मिक्सरवर बारीक करावे.

  4. 4

    आता वाटलेल्या डाळीच्या पीठात कांदा,मिक्सरमधील वाटण,कोथिंबीर, हिंगपूड,मीठ,तांदूळपीठी आणि बाजूला काढलेली भिजवलेली मूगडाळ घालावी.

  5. 5

    सर्व मिश्रण एकजीव करावे.
    गँसवर कढईत तेल तापत ठेवावे. तेल चांगले तापल्यावर हाताने याची छोटी छोटी भजी तेलात सोडावीत.लालसर होईपर्यंत तळावीत.

  6. 6

    श्रीगणरायाला याचा नैवेद्य दाखवून आरती झाल्यावर प्रसाद म्हणून खमंग,खुसखुशीत गरमागरम अशी मूगडाळ भजी सर्वांना प्लेटमध्ये सर्व्ह करावीत.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

Similar Recipes