खवा पोळी (khava poli recipe in marathi)

Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi

खवा पोळी (khava poli recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. 1 कपखवा
  2. पीठी साखर
  3. 1 टीस्पून साजुक तुप
  4. 1 टीस्पूनविलायची
  5. 1 टीस्पून खसखस
  6. 1 टीस्पून मैदा
  7. 1 कपगव्हाचे पीठ
  8. बेसन
  9. मीठ
  10. दूध

कुकिंग सूचना

  1. 1

    परातीत एक वाटी गव्हाचे पीठ आणि एक वाटी मैदा घ्यावा त्यात चीमुटभर मीठ व दोन चमचे साजूक तूप घालून दूधात कनीक भीजवून घ्यावे.

  2. 2

    कनीक एक तास चांगले भीजवून ठेवावे

  3. 3

    कढईत मंद गॅसवर खवा चांगला भाजून घ्यावा. खवा लालसर होई पर्यंत.

  4. 4

    खवा गार होण्यासाठी ताटात पसरुन ठेवावा त्याच कढईत दोन चमचे गव्हाचे पीठ तीन चमचे बेसन लालसर भाजून घ्यावे. ते पण खव्याच्या ताटात गार होण्यासाठी ठेवावे.नंतर खसखस भाजून घ्यावी व गार झाल्यावर बारीक वाटून घ्यावी.

  5. 5

    भाजलेल्या खव्याच्या मीश्रणात बारीक केलेली खसखस, पिठी साखर, गव्हाचे पीठ, बेसन, विलायची पावडर टाकून चांगले मिक्स करावे.

  6. 6

    कनकेचा गोळा करून त्यात खवा सारण भरावे

  7. 7

    खवा सारण व्यवस्थित भरून पोळी हलक्या हाताने लाटावी व तुप लावून लालसर भाजून घ्यावी.

  8. 8

    पोळी भाजून साजूक तुपा बरोबर खावी खूप छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Dalvi
Rupali Dalvi @rupalidalvi
रोजी

Similar Recipes