रवा - खवा मोदक (rava khava modak recipe in marathi)

Mrs.Nilima Vijay Khadatkar
Mrs.Nilima Vijay Khadatkar @cook_29701567
Mira Road, Maharashtra, India

मोदकाचा एक वेगळा प्रकार , रव्याचे आवरण आणि रवा- खवा- नारळाचे सारण.
एकदम खुशखुशीत .

रवा - खवा मोदक (rava khava modak recipe in marathi)

मोदकाचा एक वेगळा प्रकार , रव्याचे आवरण आणि रवा- खवा- नारळाचे सारण.
एकदम खुशखुशीत .

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१ तास
२१ मोदक
  1. 1+१/२ कप रवा
  2. 1/2 कपखवा
  3. 1/2 कपखवलेला नारळ
  4. 2 टेबलस्पूनतूप
  5. तळण्यासाठी तेल
  6. 1/2 कपदूध
  7. आवडी प्रमाणे काजू, बदाम,मनुका
  8. 1/2 टीस्पूनवेलची पुड
  9. 3/4 कपपीठी साखर

कुकिंग सूचना

१ तास
  1. 1

    कढईत १ टी. स्पून तूप घालावे,.१/२ कप रवा घालावा व रवा छान भाजून घ्यावा. व खवलेला नारळ घालून परत भाजावे नंतर खवा घालून परतून घ्यावे.

  2. 2

    शेवटी पीठी साखर, वेलची पूड व आवडीप्रमाणे ड्राय फ्रूट घालावे व मिश्रण छान मिक्स करावे.गॅस बंद करून मिश्रणात १ टी. स्पून तूप घालावे व थंड होऊ द्यावे.झाले मोदकाचे सारण तयार

  3. 3

    १ कप रवा घ्यावा त्यात १ टे.स्पुन गरम तूप घालावे, चिमूटभर मीठ घालावे, व दूध घालून गोळा तयार करावा.(साधारण १/२ कप दूध लागत) गोळा अर्धा तास बाजूला ठेवावा.

  4. 4

    अर्ध्या तासांनंतर रव्याच्या गोळा छान मळुन घ्यावा व छोटे छोटे२१ गोळे करावे,प्रत्येक गोळ्याची छोटी पारी लाटून १ चमचा सारण भरावे.

  5. 5

    सारण कमी - जास्त करून मोदक तयार करावे(इथे मी २ प्रकारच्या आकाराचे मोदक केले आहेत).

  6. 6

    २१ मोदक तयार झाल्यावर गरम तेलात मध्यम आचेवर मोदक लालसर खरपुस तळून घ्यावेत.

  7. 7

    बाप्पाला नैवद्य दाखवल्यावर झाले मोदक तयार.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Mrs.Nilima Vijay Khadatkar
रोजी
Mira Road, Maharashtra, India
Math and science teacher by profession . Interested in art and craft, writes poems .Passionate about cooking and likes to try innovative recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes