बेसन पीठाचे जाळीदार धिरडे (besan pithache dhirde recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

"बेसन पीठाचे जाळीदार धिरडे"
तोंडीलावणे म्हणून किंवा असेच खायला ही छान लागते.. घरात बाकिच्यांसाठी अंड्याचे ऑमलेट बनवले तर माझ्यासाठी मी धिरडे बनवते.. गरमागरम धिरडे टाॅमेटो केचप,दही सोबत छान लागते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

वीस मिनिटे
दोन
  1. 1 कपबेसन पीठ
  2. 1 टीस्पूनलाल तिखट
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 1 टीस्पूनओवा
  5. चवीनुसारमीठ
  6. चिमुटभरबेकिंग सोडा,ऑप्शनल आहे
  7. आवडीनुसार कोथिंबीर
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. हिंग
  10. तेल

कुकिंग सूचना

वीस मिनिटे
  1. 1

    बेसन पीठ वाटी मध्ये काढून घ्या.त्यात लाल तिखट, हळद, हिंग, जीरे, ओवा, मीठ, चिमुटभर बेकिंग सोडा घाला आणि पाणी घालून बॅटर तयार करा.. आवडीनुसार कोथिंबीर घाला..मी एक धिरड्यासाठी कोथिंबीर वापरली आहे.

  2. 2

    तवा गरम करून गॅस लो टू मिडीयम करून चमचाभर तेल सोडून पळीने बॅटर पसरवून घाला.झाकण ठेवून मिनिटभर शिजू द्यावे.नंतर पालटुन दुसरी बाजू शिजू द्या.. मस्त खरपूस भाजून घ्या.

  3. 3

    आवडीनुसार कांदा टाॅमेटो कोथिंबीर घालून ही बनवु शकता..

  4. 4

    तयार गरमागरम धिरडे टाॅमेटो केचप,दही सोबत सर्व्ह करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
लता धानापुने
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes