सुरणाचे धिरडे (suranache dhirde recipe in Marathi)

जान्हवी आबनावे
जान्हवी आबनावे @cook_27681782

#GA4 #week14
#keyword_yam
Yam म्हणजे सुरण.. खूप जणांना सुरण आवडत नाही. लहान मुलांना तर अजिबात नाही. अशावेळी असे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करून खायला घातले कि मुल आवडिने खातात.
आज मी सुरणाचे धिरडे केले आहे अगदी टेस्टी सोबत हेल्दी पण..😊

सुरणाचे धिरडे (suranache dhirde recipe in Marathi)

#GA4 #week14
#keyword_yam
Yam म्हणजे सुरण.. खूप जणांना सुरण आवडत नाही. लहान मुलांना तर अजिबात नाही. अशावेळी असे पदार्थ वेगवेगळ्या पद्धतीने करून खायला घातले कि मुल आवडिने खातात.
आज मी सुरणाचे धिरडे केले आहे अगदी टेस्टी सोबत हेल्दी पण..😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिटे
2 व्यक्तिंसाठी
  1. 1 कपज्वारीचे पीठ
  2. 1/2 कपसुरण खिसलेले
  3. 1कांदा बारीक चिरून
  4. 1 टीस्पूनआल लसूण पेस्ट
  5. 1 टीस्पूनलाल तिखट
  6. 1/2 टीस्पूनधने पावडर
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 1/4 टीस्पूनहळद
  9. 1/4 टीस्पूनओवा
  10. कोथिंबीर
  11. तेल

कुकिंग सूचना

30 मिनिटे
  1. 1

    एका भांड्यात ज्वारीचे पीठ घेऊन लाल तिखट, मीठ, धने पावडर, हळद, ओवा घालून मिक्स करावे. त्यात थोडे थोडे पाणी घालून मिश्रण तयार करुन घ्यावे. व पंधरा मिनिटे झाकून ठेवावे.

  2. 2

    सुरण घेऊन ते खिसणीवर खिसून घ्यावे.

  3. 3

    मिश्रणात कांदा, सुरण, आल लसूण पेस्ट, कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यावे.

  4. 4

    गॅसवर तवा तापत ठेवावा. थोडसं तेल तव्यावर लावून पळीने बॅटर गोलाकार पसरवून घ्या. दोन्ही बाजूला ऊलट पालट करून धिरडे छान भाजून घ्यावे.

  5. 5

    तयार धिरडे ताटावर काढून घ्या. दही, साॅस, चटणी कशाबरोबरही खाऊ शकता 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
जान्हवी आबनावे
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes