मोहनथाळ (mohanthal recipe in marathi)

Anuja A Muley
Anuja A Muley @Anu_am

मोहनथाळ (mohanthal recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
3-4 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाट्याबेसन पीठ
  2. 1 वाटीसाखर
  3. 1 वाटीपाणी
  4. 1 वाटीसाजूक तूप
  5. 1 टीस्पूनवेलची पावडर
  6. 4 टेबलस्पूनकोमट दूध
  7. 2 टेबलस्पूनजाडसर ड्रायफ्रूट पावडर

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    प्रथम एका भांड्यात बेसन पीठ घ्या, आता त्यात 2 टेबलस्पून तूप घाला आता 4 चमचे दूध घालून सर्व हातानी पीठ चोळून घ्या आणि 15 मिनिटे हे मिश्रण झाकून ठेवा

  2. 2

    आता 15 मिनिटानंतर चमच्यानी पिठ खरडून मोकळे करा

  3. 3

    आता बारीक चाळणीने हे पीठ छान चाळून घ्या बाकी उरलेले बेसनाचे जाडे गाठी हातानी मऊ करून सर्व चाळून घ्या आता रवाळ पीठ तयार आहे

  4. 4

    आता गॅसवर काढाई गरम झाल्यावर त्यात चाळलेले बेसन पीठ घालून त्यात साजूक तूप घालून बारीक गॅसवर छान भाजून घ्या सतत परत राहावे पीठ करपून द्यायचे नाही

  5. 5

    तूप सुटेपर्यंत बेसन भाजून घ्यावे कलर लाल होऊ नये छान वास येईपर्यंत बारीक गॅसवर भाजून घेणे

  6. 6

    आता गॅस बंद करणे आणि कढ़ाई बाजूला करून गार करून घेणे

  7. 7

    आता एका भांड्यात 1 वाटी साखर आणि 1 वाटी पाणी घालून त्यात वेलची पूड घालून 2 तरी पाक करून घेणे आणि हा पाका भाजलेले बेसन पिठात घाला आणि पटपट मिक्स करत रहा

  8. 8

    आता हलवताना मिश्रण हळू हळू घट्ट होईल

  9. 9

    आता एका प्लेट मध्ये किंवा एका पसरट काचेच्या भांड्याला तूप लावून घ्या आणि हे मिश्रण जाडसर ओता आणि पसरवून घ्या

  10. 10

    आता ह्याच्यावर ड्रायफ्रूटची पावडर पसरवून घ्या आणि हलकेसे हे ड्रायफ्रूट हातानी दाबून घ्या

  11. 11

    आता तयार हे मोहनथाळ फ्रीज मध्ये ना ठेवता बाहेर रूम टेंपरेचरवर गार करून घ्या

  12. 12

    पूर्ण गार झाल्यावर त्याचे हवे तसे वड्या कट करुन घ्या

  13. 13

    आता हलवाई सारखी मोहनथाळ घरच्या घरी तयार आहे सर्वाना गार झाल्यावर सर्व्ह करा

  14. 14
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anuja A Muley
रोजी

Similar Recipes