शेगाव कचोरी (Shegaon kachori recipe in marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#SFR
अतिशय खुसखुशीत व चविष्ट अशी ही कचोरी असते

शेगाव कचोरी (Shegaon kachori recipe in marathi)

#SFR
अतिशय खुसखुशीत व चविष्ट अशी ही कचोरी असते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. पारीसाठी लागणारे साहित्य
  2. पाऊण वाटी कणीक
  3. अर्धा वाटीमैदा
  4. थोडंसं मीठ
  5. एक ते दीड टेबलस्पूनतूप मोहन घालण्यासाठी
  6. आतल्या मसाल्यासाठी
  7. दीड वाटीबेसन
  8. 2 टीस्पूनआले, लसून, मिरचीची सरबरीत पेस्ट
  9. 2 टेस्पूनधने,जीरे ,बडीशेप, व त्यात थोडा ओवा हलकेच भाजून वाटलेले पावडर साधारण
  10. 1/2 चमचाआमचूर पावडर
  11. 1/4 चमचाहळद, पाव चमचा तिखट, अर्धा चमचा गरम मसाला
  12. चवीनुसारमीठ
  13. तळण्यासाठी तेल
  14. 4 ते पाच हिरव्या मिरच्या तळून खाण्यासाठी
  15. 1/2 चमचाजीर व चिमूटभर हिंग

कुकिंग सूचना

30मिनिट
  1. 1

    प्रथम कणीक व मैदा एकत्र करून त्यात मीठ घालावं व तूप गरम करून त्यात मिक्स करून एकजीव करावं मग लागेल तसे पाणी घालून पीठ घट्ट भिजवावे व एक तासासाठी ठेवून द्यावं

  2. 2

    एक कढई गॅसवर ठेवून ती गरम झाले की त्यात जीरे व हिंग घालून आलं लसूण मिरचीचे वाटण घालावं ते परतून झाले की त्यात धने जीरे व बडीशेपचे वाटण घालावं मग हळद,तिखट,गरम मसाला,आमचूर,मीठ सगळे घालून छान परता व मत शेवटी त्यामध्ये बेसन पीठ घालून खमंग भाजावे मग त्यावर पाण्याचे हापके मारून बेसन शिजेल व चिकट नाही होणार अशी काळजी घेऊन ते शिजवावं

  3. 3

    बेसनाचे लिंबाएवढे गोळे करावे त्याच प्रमाणे कणकेचे ही त्याच्यावरून जरा मोठे गोळे करावेत मग कणकेची पारी करून त्यामध्ये वेसनाचा गोळा ठेवून तो मोदकाप्रमाणे बंद करून त्याला हाताने दाबा व हलकेच लाटा व अशा सगळ्या कचोर्‍या करून त्या मध्यम आचेवर तळाव्यात त्याचप्रमाणे मिरच्यांना मध्ये काप टाकून त्याही तळव्यावर त्यावर मीठ लावावे व कचोरी बरोबर खावे खुसखुशीत सुंदर टेस्टी अशा या कचोऱ्या होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes