मटर पॅटीस (matar patties recipe in marathi)

Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21

#EB3
#W3
#विंटर स्पेशल रेसिपी
हिवाळ्यात हिरवाकंच ताजा मटर मिळायला सुरुवात होते. चवदार, गुळचट,कोवळे दाणे आले की स्वयंपाकघरात पदार्थांची रेलचेल सुरु होते. मटार भात,कचोरी, पॅटीस, उसळ,करंजी असे नानाविध प्रकार...त्यातीलच आज आपण बघूया मटर पॅटीस ची रेसिपी.

मटर पॅटीस (matar patties recipe in marathi)

#EB3
#W3
#विंटर स्पेशल रेसिपी
हिवाळ्यात हिरवाकंच ताजा मटर मिळायला सुरुवात होते. चवदार, गुळचट,कोवळे दाणे आले की स्वयंपाकघरात पदार्थांची रेलचेल सुरु होते. मटार भात,कचोरी, पॅटीस, उसळ,करंजी असे नानाविध प्रकार...त्यातीलच आज आपण बघूया मटर पॅटीस ची रेसिपी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनिटे
2-3 सर्व्हिंग्ज
  1. 7-8उकडलेले बटाटे
  2. 1 वाटीब्रेड क्रंब्स
  3. 1 वाटीताजे मटर
  4. 1 टेबलस्पूनलसूण मिरची ठेचून
  5. 1 चमचाधणे पुड
  6. 1 टीस्पूनजीरे पूड
  7. मीठ चवीनुसार
  8. 2 टेबलस्पूनमैदा (स्लरी साठी)

कुकिंग सूचना

45 मिनिटे
  1. 1

    सगळं साहित्य गोळा करून घ्यावे. एका वाट्यात उकडलेले बटाटे किसून घ्यावे व त्यात ब्रेड क्रंब्स घालावे.बटाट्याच्या ओलसर पणा चेक करून ब्रेड क्रंब्स घालावे. चवीनुसार मीठ व जीरे पूड घालून गोळा मळून घ्यावा.

  2. 2

    मटर चे दाणे मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.स्टफींग करण्यासाठी एका पॅन मध्ये तेल गरम करून लसूण, मिरची चे वाटण घालून नीट परतून घ्यावे. नंतर त्यात वाटलेले मटर चे दाणे, धणे पुड व मीठ घालून वाफ येऊ द्यावी. मिश्रम गार करून घ्यावे.

  3. 3

    बटाट्याच्या मिश्रणाचे गोळे करून त्यात सारण भरून पॅटीस चा आकार द्यावा. मैदा व पाणी एकत्र करुन त्याची स्लरी (पातळ पेस्ट) बनवून घ्यावी.एका प्लेट मध्ये ब्रेड क्रंब्स पसरवून घ्यावे.

  4. 4

    तयार पॅटीस स्लरी मध्ये बुडवून ब्रेड क्रंब्स मध्ये घोळवायचे व गरम तेलात सोनेरी रंगावर तळून घ्यावे. गरमागरम पॅटीस चटणी,केचप बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rashmi Joshi
Rashmi Joshi @Rashmij21
रोजी
I love cooking and trying new recipes.
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes