खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi

Rupali Deshpande
Rupali Deshpande @Rupali1781

खमंग ढोकळा (khaman dhokla recipe in marathi

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-35 मिनीट
3-4 सर्व्हिंग्ज
  1. बॅटर बनवण्यासाठी साहित्य
  2. 1 कपपाणी
  3. 1 कपबेसन पीठ
  4. 1/2 टीस्पूनखायचा सोडा
  5. 1 टीस्पूनलिंबू सत्व
  6. 1 टेबलस्पूनतेल
  7. चवीनुसारमीठ
  8. 3-4हिरवी मिरची
  9. 4-5लसूण पाकळ्या
  10. 1 इंचआले
  11. चिमूटभरहळद
  12. 1/4 टीस्पूनहिंग
  13. 2-3 टेबलस्पूनसाखर (चवीनुसार घेणे)
  14. तडका साहित्य
  15. 1 टीस्पूनमोहरी
  16. 1/2 टीस्पूनजीरे
  17. 1/4 टीस्पूनhing
  18. 2 टेबलस्पूनतेल
  19. 2हिरवी मिरची
  20. 5-6कढीपत्ता पाने
  21. कोथिंबीर
  22. 1/4 कपपाणी
  23. 1/4 टीस्पूनलिंबू रस
  24. 1 टेबलस्पूनसाखर

कुकिंग सूचना

30-35 मिनीट
  1. 1

    प्रथम बेसन पीठ चाळून बाउल मध्ये ठेवणे. नंतर दुसर्‍या बाउल मध्ये पाणी, लिंबू सत्व, साखर, मीठ, तेल हे सगळे मिसळून घेणे.

  2. 2

    नंतर हे मिश्रण मिक्सर भांड्यात घेणे. त्यात बेसन पीठ घालून सगळे फिरवून घेणे. म्हणजे त्यात गाठी राहणार नाहीत. आता हे बॅटर बाउल मध्ये काढून घेणे. व त्यात चवीनुसार हिरवी मिरची, लसुण, आले पेस्ट घालावी.व येक जीव करून 10 मिनीट झाकून ठेवावे.

  3. 3

    आता गॅस वर कढई ठेवावी. त्यामध्ये पाणी घालावे व एक स्टंट ठेवून त्यावर झाकण ठेवावे. पाच मिनिट कढाई गरम करून घेणे.नंतर वरील झाकण काढावे.आता खोलगट थाळी घेऊन त्याला तेल लावून घेणे.आता तयार बॅटर मध्ये अर्धा चमचा खायचा सोडा घालून ते मिश्रण एकाच बाजूने हलवून घेणे. मिश्रण हलके होऊ लागते हे मिश्रण लगेचच तेल लावलेल्या थाळीमध्ये घालून घेणे.आता ही थाळी कढई मध्ये ठेवावी त्यावर झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनिट वाफवून घेणे.

  4. 4

    नंतर वेळ झाली की गॅस बंद करावा. सुरीने ढोकळा शिजला आहे की नाही हे पहावे.ढोकळा थंड होण्यास ठेवून देणे.आता कढईमध्ये तेल घालून त्यात जीरे,मोहरी,हिंग कढीपत्ता,मिरचीचे तुकडे याची खमंग फोडणी करून घेणे आता त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून उकळी काढून घेणे.त्यातच एक चमचा साखर मीठ व लिंबूरस घालावा आता ही फोडणी तयार ढोकळ्यावर घालून घेणे.

  5. 5

    वरून कोथिंबीर घालून ढोकळा कट करून घेणे. मस्त असा खमंग आणि हलका असा ढोकळा तयार होतो. मस्त हिरवी चटणी सोबत खाण्यासाठी देणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rupali Deshpande
Rupali Deshpande @Rupali1781
रोजी

टिप्पण्या

Asmita Rupani
Asmita Rupani @Tastelover_Asmita
All your recipes are superb and delicious. You can check my profile and follow me if you wish 🙂.

Similar Recipes