कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)

Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
पुणे

#EB2 #W2
Restorant style kadhai paneer recipe

कढाई पनीर (kadai paneer recipe in marathi)

#EB2 #W2
Restorant style kadhai paneer recipe

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-40 मि
4-5 सर्व्हिंग्ज
  1. 250 ग्रॅमपनीर
  2. 4-5टोमॅटो
  3. 2कांदे
  4. 3सिमला मिरची
  5. 2काश्मिरी लाल मिरची
  6. 1बेडगी मिरची
  7. 7-8लासून पाकळ्या
  8. 1/2 इंचआल
  9. 2-3तमाल पत्र
  10. 4-5काळी मिरे
  11. 3लवंगा
  12. 2 टीस्पूनजीरे
  13. 3 टेबलस्पूनतेल
  14. 1 टीस्पूनहळद
  15. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  16. 1 टेबलस्पूनगरम मसाला
  17. 1 टेबलस्पूनपनीर मसाला
  18. 2 टेबलस्पूनफ्रेश क्रीम
  19. चवीनुसारमीठ
  20. गरजेनुसार पाणी
  21. थोडी कोथिंबीर

कुकिंग सूचना

30-40 मि
  1. 1

    प्रथम 3 टोमॅटो,आला,लसूण आणी काश्मिरी मिरची एकत्र करून मिक्सर मध्ये बारीक वाटून प्युरी तयार करून घेणे.आता एक कांदा बारीक चिरून घ्या.आणी राहिलेले टोमॅटो आणी कांदा,सिमला मिरची मोठे चिरून घेणे.

  2. 2

    आता कढई मध्ये तेल ऍड करून जिऱ्याची फोडणी तयार करून त्या मध्ये तमालपत्र, लवंग,मिरे आणी बारीक चिरलेला कांदा ऍड करून 2 मिनिटे परतून घेणे आता यात हळद आणी लाल तिखट ऍड करून कांदा सोनेरी परतून घ्या

  3. 3

    आता परतलेल्या कांद्या मध्ये टोमॅटो प्युरी, गरम मसाला ऍड करा आणी तेल सुटेपर्यत प्युरी छान परतून घ्या.

  4. 4

    आता दुसऱ्या प्यान मध्ये तेल ऍड करा आणी त्यामध्ये बेडगी मिरची,मोठे चिरलेला कांदा टोमॅटो,ढोबळी मिरची,ऍड करून छान 5 मिनटे परतून घ्या.पनीर कट करून याच प्यान मध्ये थोडे फ्राय करून घ्या.आता हे सर्व परतलेल्या प्युरी मध्ये ऍड करा.

  5. 5

    आणी यात पनीर मसाला,चवीनुसार मीठ, आणी थोडे पाणी ऍड करा झाकण ठेऊन 10 मिनिटे छान वाफून घ्या.आता क्रीम ऍड करून मिक्स करा 2 मिनिटे ठेवा.वरून कोथिंबीर टाका मस्त स्पायसी कढई पनीर तयार.

  6. 6

    रोटी, नान,पोळी सोबत कढई पनीर सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Suvarna Potdar
Suvarna Potdar @suvarna_potdar2811
रोजी
पुणे

टिप्पण्या

Similar Recipes