वरीचा भात आणी पेरू बटाटा आमटी (उपवास स्पेेेशल) (waricha bhat peru batata amti recipe in marathi)

SONALI SURYAWANSHI
SONALI SURYAWANSHI @SPS21

वरीचा भात आणी पेरू बटाटा आमटी (उपवास स्पेेेशल) (waricha bhat peru batata amti recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मीनीट
2 सर्व्हिंग्ज
  1. वरीचा भात बनवण्या साठीच साहित्य :-
  2. 1 वाटीवरी
  3. 2 चमचेसाबुदाणा
  4. 1/2 चमचेतेल
  5. मीठ चवीनुसार
  6. गरजेनुसार पाणी
  7. आमटी बनवण्या साठीच साहित्य :-
  8. 1पेरू
  9. 1बटाटा
  10. 2 चमचेहिरवी मिरची आणी ओला नारळा याची पेेस्ट
  11. 1/2 चमचेशेंगदाणे पावडर
  12. चवीनुसारलाल तिखट
  13. मीठ
  14. 1/2 चमचातेल
  15. पाणी आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

30मीनीट
  1. 1

    वरी आणी साबुदाणा छान भाजून घ्या भाजुन झाला की त्यात आवश्यक ते नुसार पाणी ओता आणी चवीनुसार मीठ घाला व थोड तेल सोडा उखळी आली की गैस कमी करुन घ्या. आणी सर्व पाणी आटले की झाकण ठेऊन दया व गैस बंद करा.

  2. 2

    पेरू आणी बटाट्याची वरची साल काढून बारिक चिरुन घ्या. (पेरूच्या बिया काढा)

  3. 3

    आता गैस वर कढईमध्ये तेल टाकून मिरची,ओल्या नारळाची पेस्ट,लाल तिखट घाला. बटाटा आणी पेरू चीरलेला घालुन गरजे नुसार पाणी ओता.आणी चवीनुसार मीठ घालून छान ढवळून घ्या आणी बारिक गैस वर शिजवून घ्या.

  4. 4

    गरमा गरम उपवासाचा वरिचा भात आणी पेरू बटाटा आमटी खाण्यासाठी तयार

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
SONALI SURYAWANSHI
रोजी

Similar Recipes