नवरतन व्हेज पुलाव (navratna veg pulav recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

#cpm4
नवरतन ”म्हणजे नऊ रत्न. या पुलावामध्ये 9 भाज्या आणि सुकामेवा मिळून घालतात (मी 9 पेक्षा जास्त वापरले आहेत). नवरतन पुलाव हा एक रॉयल डिश म्हणून ओळखले जाते, आणि तो विशेष प्रसंगी बनविला जातो. चला तर मग बघूया नवरतन व्हेज पुलावची रेसिपी 😊👍

नवरतन व्हेज पुलाव (navratna veg pulav recipe in marathi)

#cpm4
नवरतन ”म्हणजे नऊ रत्न. या पुलावामध्ये 9 भाज्या आणि सुकामेवा मिळून घालतात (मी 9 पेक्षा जास्त वापरले आहेत). नवरतन पुलाव हा एक रॉयल डिश म्हणून ओळखले जाते, आणि तो विशेष प्रसंगी बनविला जातो. चला तर मग बघूया नवरतन व्हेज पुलावची रेसिपी 😊👍

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपबासमती तांदूळ
  2. 1/2 कपगाजर
  3. 1/2 कपबटाटा
  4. 1/2 कपग्रीन बीन्स चिरलेला
  5. 1 कपफुलकोबी
  6. 1टोमॅटो चिरलेला
  7. 1/3 कपसिमला मिरची
  8. 1 कपहिरवा वाटाणा
  9. 1 कपकाॅर्न
  10. 100 ग्रॅमपनीर
  11. 1कांदा मोठा, उभा कापलेला
  12. 1 चमचेआले किसलेले
  13. 2हिरव्या मिरच्या
  14. 2तेज पत्ता
  15. 2हिरवी वेलची (आता विकत घ्या)
  16. 2काळ्या वेलची (आता विकत घ्या)
  17. 1 चमचाजीरे
  18. 1 इंचदालचिनी स्टिक
  19. 2-3लवंग
  20. 3-4काळी मिरी
  21. १०-१२ बदाम
  22. 15-17गोल्डन मनुका
  23. 20काजू
  24. 1.5 चमचेमीठ
  25. 4 चमचेतूप
  26. कोमट दुधात भिजवलेले काही केशर

कुकिंग सूचना

45 मि
  1. 1

    सर्व साहित्य एका ठिकाणी जमा करून घ्यावे सर्व भाज्या बारीक चौकोनी आकारात कापून ठेवाव्यात. एका मोठ्या पॅनमध्ये तूप गरम करावे आणि काजू, बदाम मनुका आणि पनीर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळा. त्यांना बाहेर काढा आणि बाजूला ठेवा.

  2. 2

    कढईत बाकीचे २ चमचे तूप घाला. गॅस मध्यम ठेवा. त्यात तमालपत्र, हिरवी व काळी वेलची, जीरे, मिरची, लवंगा आणि दालचिनीची काडी घाला. एक मिनिट परता आणि नंतर त्यात कांदे घाला.कांदा गोल्डन झाल्यावर त्यात किसलेले आले, बटाटे, गाजर, फुलकोबी, फरसबी घाला. एक मिनिट परता आणि चार ते पाच मिनिटे कढाई झाकून ठेवा. आता शिमला मिरची, टोमॅटो, हिरवी मिरची, हिरवा वाटाणा घाला आणि भाज्या सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्या.

  3. 3

    पनीर, कॉर्न, तळलेले काजू, बदाम, मनुका आणि मीठ घालून मिक्स करावे.

  4. 4

    तांदूळ धुवून 20 मिनिटे भिजवा. त्यानंतर एका मोठ्या भांड्यात 4 कप पाणी उकळा आणि त्यात अर्धा चमचे मीठ आणि तांदूळ घाला. एकदा ते ८० टक्के शिजले की चाळणीत गाळा आणि बाजूला ठेवा.
    आता पातेल्यात शिजलेला तांदूळ घाला आणि हळू मिक्स करावे जेणेकरुन तांदूळ फुटू नये. केशर दूध घाला आणि झाकणाने पॅन झाकून ठेवा. 7-8 मिनिटे मंद आचेवर शिजू द्या आणि गॅस बंद करा.

  5. 5

    सर्व्हिंग प्लेटवर नवरातन पुलाव वाढून घ्या आणि त्याचा गरमागरम आनंद घ्या लाल भोपळ्याच्या रायत्याबरोबर 😋

  6. 6
  7. 7
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

Similar Recipes