मकर संक्रांति स्पेशल भोगीची मिक्स भाजी (bhogichi mix bhaji recipe in marathi)

Gital Haria
Gital Haria @cook26291494
Malegaon

#मकर
भोगीच्या भाजी चा टेस्ट आणि उंधियु दोघांचा टेस्ट सारखाच आहे .करण्याच्या पद्धती पण सारखेच आहे उंधियो मध्ये मेथीचे मुठिये हे टाकली जातात आणि त्याच पद्धतीने मी आज भोगीची भाजी बनवण्याचा प्रयत्न केला आणि ती खूपच छान अशी भोगीची भाजी बनली ती सगळ्यांना आवडली... मी येथे बटाट्याचा, वांग्याचा उपयोग नाही केलाय आहे.. कच्ची केळी टाकली आहे थंडीच्या दिवसांमध्ये भाज्या खूप छान मिळतात आणि त्या वेळेस आपण या मिक्स भाज्यांचा उपयोग करून भाजी बनवली असतात सर्व विटामिन्स आपल्याला एका भाजीत मिळतात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
8व्यक्ती
  1. मिक्स भाजी
  2. 1कच्ची केळी चे मोठे काप केले आहे
  3. 1/2कॅप्सिकम मिडीयम साईज शिरलेला
  4. 1गाजर मिडीयम चिरलेला
  5. 1रताळु मोठे काप केले
  6. 1/2 कपहिरवा वाटाणा, हरभरे,वालच्या शेंगांचे दाणे 3 मिक्स
  7. 25 ग्रॅमवालाच्या शेंगा
  8. 1मीडियम साईजचा टोमॅटो चिरलेला
  9. तीन-चार घेवडा मीडियम चिरलेला
  10. थोडीशी फुलकोबी
  11. ज्वारीचा हुरडा थोडासा
  12. मसाला वाटण्यासाठी
  13. 1 टेबलस्पूनओल खोबरे
  14. 1 टेबलस्पूनपांढरे तीळ
  15. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  16. 2 टेबलस्पूनलाल तिखट
  17. 2 टेबलस्पूनधणे-जीरे पूड
  18. 1 टीस्पूनगरम मसाला
  19. चवीनुसारमीठ
  20. 50 ग्रॅमकोथंबीर
  21. 1हिरवी मिरची
  22. 1 लहानअद्रक चा तुकडा
  23. 1/2 टीस्पूनहळद
  24. 1/4 टीस्पूनहिंग
  25. 3 टीस्पूनफोडणीसाठी तेल
  26. 15ते 20 ग्रॅम गुड
  27. 1/2 टीस्पूनजीरे
  28. 1/2 टीस्पूनओवा

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    सर्व प्रथम सर्व भाज्या व्यवस्थित धुऊन चिरून तयारी करून घ्या कोथिंबीर आणि बाकीचे सर्व मसाले टाकून ग्रेव्ही तयार करून घ्या.

  2. 2

    गॅस वर कुकर गरम करायला ठेवा त्यामध्ये तेल, जीरे, ओवा, हिंग आणि हळद टाका त्यानंतर तयार केलेली ग्रेवी टाका. ग्रेव्हीला व्यवस्थित परतून घ्या

  3. 3

    त्यानंतर सर्व भाज्या त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्या. थोडे पाणी टाका

  4. 4

    त्यानंतर गुड टाका व्यवस्थित मिक्स करून कूकरचे झाकण बंद करून तीन शिट्टी घ्या.

  5. 5

    मस्त अशी गरमागरम मी भोगीची भाजी आपली तयार झालेली असेल कांदा, लिंबू टाकून भाजीही तयार आहे.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Gital Haria
Gital Haria @cook26291494
रोजी
Malegaon

टिप्पण्या

Similar Recipes