तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)

लता धानापुने
लता धानापुने @lata22

#EB9
#Week9
#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook

"तिळगुळाची वडी"

मऊसुत होते,तोंडात घालताच विरघळणारी.. थंडीमध्ये तिळगुळ शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. संक्रांतीच्या निमित्ताने घरोघरी तिळगूळाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील एक तिळगुळ वडी, करायला सोपी,कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी..

तिळगुळाची वडी (tilgulachi vadi recipe in marathi)

#EB9
#Week9
#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook

"तिळगुळाची वडी"

मऊसुत होते,तोंडात घालताच विरघळणारी.. थंडीमध्ये तिळगुळ शरीरामध्ये उष्णता निर्माण करते. संक्रांतीच्या निमित्ताने घरोघरी तिळगूळाचे पदार्थ बनवले जातात. त्यातील एक तिळगुळ वडी, करायला सोपी,कमी साहित्यात आणि झटपट होणारी रेसिपी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

पंचवीस मिनिटे
घरातील सगळे
  1. 1/2 कपपांढरे तीळ
  2. 1/2 कपशेंगदाणे
  3. 1 कपगूळ
  4. 1/2 टीस्पूनवेलचीपूड
  5. 1 टीस्पूनतूप

कुकिंग सूचना

पंचवीस मिनिटे
  1. 1

    तीळ, शेंगदाणे खमंग भाजून घ्यावे. शेंगदाण्याची टरफले काढून घ्या व मिक्सरमध्ये फिरवून घ्या. जास्त बारीक नाही करायचे. प्लेट मध्ये काढून घ्या व तिळ मिक्सरमध्ये फिरवून घ्या. गुळ बारीक कापून घ्या.

  2. 2

    पॅनमध्ये गूळ व दोन टेबलस्पून पाणी घालून मिडीयम गॅसवर सतत हलवत रहा. गूळ पुर्ण वितळल्यावर दोन तीन मिनिटे पाक शिजू द्या.

  3. 3

    पाकामध्ये वेलचीपूड आणि तूप घालून मिक्स करा व तीळ शेंगदाण्याची भरड टाकून चांगले मिक्स करा दोन मिनिटे हलवत रहावे.

  4. 4

    ट्रे किंवा ताटाला
    तूप लावून ग्रीस करा. मिश्रण ओतून एकसारखे पसरवून घ्या..वर चिमुटभर पांढरे तीळ व पिस्त्याचे काप भुरभुरावे.. छान दिसतात व टेस्ट ही छान लागते. पाच मिनिटांनी लगेच हव्या त्या आकारात कापून घ्या..

  5. 5

    थंड झाल्यावर वड्या प्लेट मध्ये काढून सर्व्ह करा. (लगेच काढल्या तरी पटकन निघतात.)

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
लता धानापुने
रोजी

Similar Recipes