ओल्या हळदीचे लोणचे (Olya haldiche lonche recipe in marathi)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
Nashik, Maharashtra

ओल्या हळदीचे लोणचे (Olya haldiche lonche recipe in marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिट
5 सर्व्हिंग्ज
  1. २५० ग्रॅम ओली हळद
  2. २५ ग्रॅम आलं
  3. 2 टेबलस्पूनतिखट
  4. 2 टेबलस्पूनमोहरीची डाळ
  5. 3लवंग
  6. 5काळी मीरी
  7. 3 टेबलस्पूनतेल
  8. १ १/२ टेबलस्पून मीठ (चवीनुसार)
  9. 2लींबांचा रस

कुकिंग सूचना

४० मिनिट
  1. 1

    प्रथम ओली हळद व आलं स्वच्छ धुऊन कोरडे केले. दोन्ही ची सालं काढून घेतली. मीरी व लवंगेची भरड करून घेतली.

  2. 2

    आता गॅसवर कढईमध्ये तेल गरम केले. कोमट झाल्यावर त्यात मोहरी ची डाळ, तीखट,लवंग व मीरी भरड सर्व मीक्स केले.

  3. 3

    एका वाटी मधे हळदीचा व आल्याचा कीस घेऊन त्यात थंड केलेले वरील मिश्रण ओतून मिक्स केले. मग मीठ व लिंबाचा रस मीक्स केला.

  4. 4

    ह्यात आवडत असल्यास थोडा गुळ मीक्स केला तरी चव छान येते. सुरवातीला काही दिवस हे लोणचे रोज एकदा तरी हलवावे लागते.

  5. 5

    तयार लोणचं बरणीत भरून ठेवावे. हे फ्रीजमध्ये वर्षभर ही चांगले राहते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
रोजी
Nashik, Maharashtra

टिप्पण्या (4)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
आपण फोडणीला घालतो ती मोहरी.

Similar Recipes