ब्रोकोली आल्मंड सूप (broccoli almond soup recipe in marathi)

Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
Pune

#EB11#W11
ब्रोकोली हे cabbageवर्गातील छोटेसे झाडच आहे.याचे मूळ इटलीमधले.परंतू भरपूर खनिजे,कार्ब्ज आणि व्हिटॅमिन युक्त असल्याने याचा आहारातील समावेश खूपच लाभदायक आहे.कँन्सरवर मात करण्यासाठी आणि इम्यूनसिस्टीम बळकट करण्यासाठी ब्रोकोली अत्यंत उपयुक्त आहे. थंडीमध्ये भरपूर प्रमाणात हल्ली भारतीय बाजारपेठेतही उपलब्ध असल्याने याचा सूप,पास्ता,पिझ्झा यात सहज समावेश आढळतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30मि.2502 मि
5व्यक्ती
  1. 250 ग्रँम ब्रोकोली तुरे काढून
  2. 15-20बदाम -भिजवून साले काढलेले
  3. 1कांदा बारीक चिरुन
  4. 2-3 टेबलस्पूनबटर
  5. 2चीजक्युब्ज
  6. 1 टीस्पूनमीरपूड
  7. 1 टीस्पूनमीठ
  8. 100ml.पँक तयार क्रीम /फेटलेली ताजी साय

कुकिंग सूचना

30मि.2502 मि
  1. 1

    ब्रोकोली एकदम ताजी व करकरीत असावी.त्याचे तुरे काढावेत.कांदा बारीक चिरावा.

  2. 2

    बटरवर कांदा परतून घ्यावा.त्याला पाच मिनिटे वाफ येऊ द्यावी. त्यावर तुरे काढलेली ब्रोकोली घालावी व परतून वाफ येऊ द्यावी.शिजण्यास थोडेसे पाणी घालावे.

  3. 3

    कांदा व ब्रोकोली थंड झाल्यानंतर मिक्सरमध्ये सोललेले बदाम,कांदा व ब्रोकोली घालून मिश्रण एकजीव होईपर्यंत फिरवावे.घट्ट वाटल्यास यात पाणी घालावे.क्रीम घालून एकदा फेटावे व मिक्सरमधून नॉनस्टिक कढईत उकळण्यास ठेवावे.मीठ व मीरपूड आवडीनुसार घालून उकळी येऊ द्यावी. चीज क्यूब्ज किसून घालावे. गरमागरम ब्रोकोली आल्मंड सूपचा मस्त थंडीत आस्वाद घ्यावा.😋🤗

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sushama Y. Kulkarni
Sushama Y. Kulkarni @sushama_2264
रोजी
Pune
सदा सर्वदा योग कुकपँडचा घडावा ।कुकपँड कारणी नवा पदार्थ माझा घडावा ।आवडीने पदार्था सुगरणीने तो करुनी पहावा ।मने जिंकण्या मार्ग पोटातून जावा ।।
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes