पातळ पोह्यांचा कांदे टाकून चिवडा.(Patal pohe chivda recipe in marathi)

Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande

#MBR #मसाला बॉक्स रेसिपी... एरवी चिवडा करताना आपण जनरली कांदे टाकत नाही पण मी पातळ कांदा चिरून थोडेसे वाळवून तळून पातळ पोह्यांचा चिवडा केलेला आहे हा चिवडा अतीशय सुंदर लागतो.. तसेच आपण यात लसून सुद्धा टाकू शकतो....

पातळ पोह्यांचा कांदे टाकून चिवडा.(Patal pohe chivda recipe in marathi)

#MBR #मसाला बॉक्स रेसिपी... एरवी चिवडा करताना आपण जनरली कांदे टाकत नाही पण मी पातळ कांदा चिरून थोडेसे वाळवून तळून पातळ पोह्यांचा चिवडा केलेला आहे हा चिवडा अतीशय सुंदर लागतो.. तसेच आपण यात लसून सुद्धा टाकू शकतो....

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30-मीनीटे
  1. 1/2 कीलो पातळ पोहे
  2. 4मोठे कांदे पातळ चीरून ऊन्हात वाळलेले
  3. 1 वाटीमक्याचे पोहे तळून
  4. 100 ग्रामशेंगदाणे
  5. 100 ग्रामडाळवा फुटाणे
  6. 50 ग्रामसुके खोबऱ्याचे काप
  7. 1 वाटीकढिपत्ता पाने
  8. 7-8हीरव्या मीर्ची कट करून
  9. 1 टेबलस्पूनजीरे
  10. 1 टेबलस्पूनमोहरी
  11. 1 टीस्पूनहींग
  12. 1 टेबलस्पूनधणेपूड
  13. 2 टेबलस्पूनतीखट
  14. 2 टेबलस्पूनतीळ
  15. 1 1/2 टेबलस्पूनहळद
  16. 1 टेबलस्पूनआमचूर पावडर
  17. 1 टेबलस्पूनमीठ
  18. 2 टेबलस्पूनपिठीसाखर
  19. 2 वाटीतेल

कुकिंग सूचना

30-मीनीटे
  1. 1

    कांदे पातळ चिरून उन्हात वाळवून घेणे... सोबत पोहे सुद्धा साफ करून उन्हात वाळवून घेणे... गॅसवर एखाद्या मोठ्या गंजात पोहे थोडेसे कुरकुरीत भाजून घेणे...

  2. 2

    सगळे साहित्य काढून घेणे आणि मक्याचे पोहे सुद्धा तळून घेणे....

  3. 3

    आता मोठ्या गरजांमध्ये तेल गरम करणे त्याच्यामध्ये जीरे,मोहरी, कढीपत्ता, हींग आणि चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकणे... खुप सुक्या खोबर्‍याचे तुकडे टाकून परतून घेणे... तीळ, डाळवा फुटाणे,शेंगदाणे टाकून परतावे...

  4. 4

    गॅस मिडीयम करून सगळ्यात शेवटी वाळलेले कांदे आणि सगळे मसाले टाकुन परतणे...(कांदे वाळलेल्या असल्यामुळे लगेच लाल होतात म्हणून गॅस हळु करून मसाले आणि कांदे टाकून परतावे....)

  5. 5

    पोहे टाकून मिक्स करणे नंतर तळलेले मक्याचे पोहे टाकून ते पण मिक्स करणे....

  6. 6

    पिठीसाखर, आमचूर आणि मीठ टाकावे.... आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेणे...

  7. 7

    पातळ पोह्यांचा कांदे टाकून चिवडा तयार...

  8. 8
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Varsha Deshpande
Varsha Deshpande @varsha_deshpande
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes