पापलेट फिश फ्राय (Pomfret Fish Fry Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

माशांमध्ये आवडते प्रकार म्हणजे वाम,सुरमई आणि पापलेट.
आज खूप दिवसांनी पापलेट बनवले. नेहमी रवा, लाल तिखट, मीठ लावून करते.
आज मात्र हिरव्या मिरचीचे वाटण लावून,वरून रवा लावून केले.

पापलेट फिश फ्राय (Pomfret Fish Fry Recipe In Marathi)

माशांमध्ये आवडते प्रकार म्हणजे वाम,सुरमई आणि पापलेट.
आज खूप दिवसांनी पापलेट बनवले. नेहमी रवा, लाल तिखट, मीठ लावून करते.
आज मात्र हिरव्या मिरचीचे वाटण लावून,वरून रवा लावून केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४-५ जणांसाठी
  1. 5 लहानआकाराचे पापलेटचे तुकडे (साधारण ७५०/८०० ग्रॅम)
  2. ३-४ हिरव्या मिरच्या
  3. 1 इंचआले
  4. 7-8लसूण पाकळ्या
  5. मूठभरकोथिंबीर
  6. १ १/२ टेबलस्पून लाल तिखट
  7. 1/4 टीस्पूनहळद
  8. 1/2लिंबाचा रस
  9. चवीप्रमाणे मीठ
  10. 3/4 कपरवा
  11. फ्राय करण्यासाठी तेल

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    मिक्सरच्या भांड्यात आलं-लसूण, हिरवी मिरची व कोथिंबीर घालून अर्धा टेबलस्पून पाणी घाला. वाटण बारीक वाटून घेणे. जास्त पाणी घालू नये नाहीतर वाटण पातळ होईल. पापलेट स्वच्छ धुवून घेणे.

  2. 2

    पापलेटच्या तुकड्यांना हिरवे वाटण, लाल तिखट,हळद, मीठ व लिंबाचा रस घालून व्यवस्थित तुकड्यांना चोळून घेणे.

  3. 3

    एका डिश मध्ये रवा,‌उ उरलेले लाल तिखट व मीठ घालून मिक्स करून घेणे. मीठ कमी घालणे. कारण आधी माशाला पण मीठ लावलेले आहे.

  4. 4

    गॅसवर पॅन गरम करत ठेवावा. त्यात थोडेसे तेल घालावे. पापलेटचे मसाला लावलेले तुकडे रव्याच्या मिश्रणात घोळवुन घेणे. रवा व्यवस्थित दाबून घेणे. रवा लावलेले पीस पॅनमध्ये घालून फ्राय करून घेणे. दोन्ही बाजूने व्यवस्थित फ्राय करून घेणे.८-१० मिनिटे लागतात.

  5. 5

    अशाप्रकारे कुरकुरीत छान पापलेट फ्राय करून घ्यावेत.
    गरमागरम पापलेट फ्रायचा आस्वाद घ्यावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes