केरळ स्टाईल पापलेट फ्राय

Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649

#सीफुड
मांसाहारी जेवण म्हटलं की सर्व तयारीनिशी सुरुवात करायला लागते. रविवार असला की फिश फ्राय पाहिजेच नाहीतर रविवार असा वाटतच नाही. आज मी केरळ स्टाईल पापलेट फ्राय केलं आहे. केरळला गेलो तेव्हा फ्राईड फिश खायचे म्हणून एका धाब्यावर गेलो तिथे आपल्याला पाहीजे ते मासे आत किचनमध्ये जाऊन दाखवायचे कारण तिकडच्या स्थानिक लोकांना हिंदी कळत नाही त्यांचीच भाषा समजते. त्यांचं ते केळीच्या पानात फिश फ्राय केलेले सर्व्ह करण खूप आवडलं मला. त्यांनी कोणकोणते मसाले मॅरीनेट करायला वापरले ते विचारून घेतले (अर्थातच आमचा ड्रायव्हर केरळी होता त्याने आम्हाला इंग्लिश मध्ये सांगितले) तसेच त्यांनी जसे मसाले लावून थोडा मालवणी ट्विस्ट म्हणजे गव्हाचे पीठ, रवा, तांदळाचे पीठ,मालवणी मसाला, मीठ असे तयार करून त्यात घोळवून खोबरेल तेलात फिश फ्राय करुन बघितले खुप आवडले सर्वांना. केरळमध्ये फ्राय करायला खोबरेल तेल वापरले जाते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
२ जण
  1. मोठी पापलेट
  2. मॅरीनेट साठी :
  3. १/२ टिस्पून मिठ
  4. १ टिस्पुन लिंबूरस
  5. १ टिस्पून मीठ
  6. १/४ टिस्पून हळद
  7. मसाला लावण्यासाठी :
  8. १ टिस्पून लाल तिखट
  9. १ टिस्पून धनेजिरे पावडर
  10. १/२ टिस्पुन हळद
  11. १ टिस्पून लिंबूरस
  12. १ टिस्पून पाणी
  13. घोळवण्यासाठी :
  14. ३ टेबलस्पूनगहूपीठ
  15. १ टेबलस्पूनबारीक रवा
  16. १ टिस्पूनतिखट
  17. १/४ टिस्पून मीठ
  18. फ्राय करण्यासाठी खोबरेल तेल

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम अख्खे पापलेटला चिरा देऊन तोंडाकडचा भाग कापून स्वच्छ धुवून त्याला मीठ, हळद, लिंबूरस लावून १५ मिनिटे मॅरीनेट करा.

  2. 2

    डिशमध्ये तिखट, हळद, धनेजिरेपूड, मीठ, लिंबाचा रस व थोडे पाणी घालून पेस्ट बनवा.

  3. 3

    ती पेस्ट पापलेटला लावून परत १० मिनिटे मॅरीनेट करा.

  4. 4

    डिशमध्ये गव्हाचे पीठ, रवा, मीठ, तिखट घालून मिक्स करा. व यात मॅरीनेटेड पापलेट घोळवा. पॅनमध्ये खोबरेल तेल गरम करून त्यात सोडा.

  5. 5

    खरपूस असे दोन्ही बाजूने भाजून घ्या.

  6. 6

    मस्त गरमागरम पापलेट फ्राय सर्व्ह करा. सोबत सोलकढी सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Deepa Gad
Deepa Gad @cook_19334649
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes