गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)

Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
Thane

#BRK
ही रेसिपी मी यू ट्यूबवर पाहीली आणि करून बघितली.

गार्लिक ब्रेड (Garlic Bread Recipe In Marathi)

#BRK
ही रेसिपी मी यू ट्यूबवर पाहीली आणि करून बघितली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२ तास
३ जणांसाठी
  1. 150 ग्रॅममैदा
  2. 1 टीस्पूनड्राय यीस्ट
  3. 1/2 कपदूध
  4. 1 टीस्पूनसाखर
  5. 1 (1/2 टीस्पून)मीठ
  6. 2 टीस्पूनतेल
  7. 50 ग्रॅमअमूल बटर
  8. 15लसूण पाकळ्या बारीक चिरून
  9. 1/4 वाटीबारीक चिरलेली कोथिंबीर
  10. 1 वाटीकिसलेले चीझ
  11. 2 टीस्पूनचिली फ्लेक्स
  12. 2 टीस्पूनऑरीगॅनो

कुकिंग सूचना

२ तास
  1. 1

    प्रथम १/२ कप दूधांत ड्राय यीस्ट व साखर घालून एकजीव करून १० मिनिटे फरमेंट करण्यासाठी ठेवले.

  2. 2

    नंतर एका भांड्यात मैदा, मीठ व फर्मेंटेड यीस्ट घालून मैदा मळून घेतला व तेल लावून १ तासासाठी झाकून ठेवला.
    एका वाटीत अमूल बटर, चिरलेली लसूण व चिरलेली कोथिंबीर घालून सर्व एकजीव करून ठेवले.

  3. 3

    नंतर फुगून वर आलेला मैद्याचा गोळा परत मळून नंतर थोडा कोरडा मैदा भुरभुरवून त्यावर लाटून घेतला.

  4. 4

    नंतर लाटलेल्या पोळीच्या अर्ध्या भागावर अमूल बटर चे मिश्रण पसरवले. त्यावर चीझ पसरवले व नंतर त्यावर चिली फ्लैक्स व ऑरिगॅनो भुरभुरवले.

  5. 5

    नंतर पोळीचा अर्धा भाग त्यावर घालून त्याच्या कडा बंद करून घेतल्या. नंतर त्यावर उरलेले बटर चे मिश्रण लावले व त्यावर चिली फ्लैक्स व ऑरिगॅनो भुरभुरवले. नंतर त्यावर चीरा मारून घेतल्या

  6. 6

    ओवन १८०° वर सेट करून १० मिनीटांसाठी प्रीहीट केला. नंतर प्रीहीट केलेल्या ओवनमध्ये तयार स्टफ्ड ब्रेड २० मिनीटे भाजून घेतला. झाला तयार गार्लिक ब्रेड.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Neelam Ranadive
Neelam Ranadive @NeelamVRanadive
रोजी
Thane

Similar Recipes