पारंपारिक कुळथाचं पिठलं (Kulthache Pithle Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

गरम गरम भाकरी व कुळथाचे पिठलं अतिशय टेस्टी होतं व पावसाळ्यामध्ये खायला मस्त वाटतं

पारंपारिक कुळथाचं पिठलं (Kulthache Pithle Recipe In Marathi)

गरम गरम भाकरी व कुळथाचे पिठलं अतिशय टेस्टी होतं व पावसाळ्यामध्ये खायला मस्त वाटतं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मिनिट
3 सर्व्हिंग्ज
  1. 2 वाटीकुळथाचेपीठ
  2. 10लसणाच्या पाकळ्या
  3. 15कडीपत्त्याची पाने
  4. थोडीशीकोथिंबीर बारीक कापलेली
  5. 1 टेबलस्पूनतेल
  6. 1/2 चमचाजीरे ,अर्धा चमचा मोहरी चिमूटभर हिंग
  7. दीड चमचा तिखट
  8. पाव चमचा हळद
  9. 2 टीस्पूनसाजूक तूप
  10. चवीनुसारमीठ
  11. एक टीस्पून गुळ

कुकिंग सूचना

25मिनिट
  1. 1

    प्रथम कुडताच्या पिठामध्ये पाणी घालून एकजीव करावं त्यामध्ये हळद, तिखट मीठ,गूळ घालून ठेवावं

  2. 2

    कढई गॅसवर ठेवून त्यात तेल घालावं तेल गरम झालं की हिंग,मोहरी, जिरं व ठेचलेला लसूण घालून कढीपत्ता घालावा खमंग फोडणी झाली की लसूण लालसर करावा.

  3. 3

    मग त्यामध्ये पाण्यात कालवलेलं पीठ घालावं व अजून दोन वाटी पाणी घालून छान हलवावं व थोडी कोथिंबीर घालून छान उकळू द्यावं पाच ते सहा मिनिटात मिश्रण घट्ट होतं मग त्यावर साजूक तूप उरलेली कोथिंबीर घालून गरम गरम भाकरी बरोबर खावं अतिशय टेस्टी व रुचकर असं पारंपारिक कुळथाचे पिठलं तयार होतं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes