उपासाची भगर आमटी (upvasachi bhagar amti recipe in marathi)

Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154

#cpm6
#trending recipe
#उपवासाची भगर आमटी
माझ्या सासरी खूप रस्ता पास चालायचे. सतत साबुदाणा खाऊनही बरेचदा पोटखराब व्हायचे. नवरात्रामध्ये नऊ दिवस उपास त्यामुळे काहीतरी हलकफुलक बनव असे सर्व सांगायचे. भगर आमटी ही सर्वात चांगली पाचक असून शरीराला खूप पौष्टिकता प्रदान करते.

उपासाची भगर आमटी (upvasachi bhagar amti recipe in marathi)

#cpm6
#trending recipe
#उपवासाची भगर आमटी
माझ्या सासरी खूप रस्ता पास चालायचे. सतत साबुदाणा खाऊनही बरेचदा पोटखराब व्हायचे. नवरात्रामध्ये नऊ दिवस उपास त्यामुळे काहीतरी हलकफुलक बनव असे सर्व सांगायचे. भगर आमटी ही सर्वात चांगली पाचक असून शरीराला खूप पौष्टिकता प्रदान करते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

तीस मिनिटे
दोन व्यक्ती करिता
  1. 200 ग्रामभगर
  2. 8कोकम
  3. 4हिरव्या मिरच्या
  4. 1 वाटीशेेेंगदाणे
  5. 1 टीस्पूनकिसलेले आले
  6. 1/2लिंबू
  7. 1/4 वाटीगूळ
  8. 2 टी स्पूनसाजूक तूप
  9. 1 टीस्पूनसाखर
  10. 1 टेबलस्पूनजीरे
  11. 2 टेबलस्पूनकिसलेले खोबरे
  12. मीठ

कुकिंग सूचना

तीस मिनिटे
  1. 1

    सर्वप्रथम भगर स्वच्छ धुऊन अर्धा तास भिजवून ठेवावेत. शेंगदाणे भाजून घ्या. ते थंड झाले की ते सालासकट बारीक करून घ्या. हिरव्या मिरच्या चे तुकडे करून घ्या. कोकम गरम पाण्यामध्ये चार तास भिजत घाला.

  2. 2

    आता एका पॅनमध्ये तूप टाका. यात जीरे व हिरव्या मिरच्या घाला. आता यात धुत लेली भगर घाला. चांगले परतून घ्या. आता यात अर्धा दाण्याचा कूट व किसलेले खोबरे घाला. चांगले परतून घ्या. आता यात मीठ व साखर घाला.

  3. 3

    आता यात दोन वाट्या पाणी घालून यावर झाकण ठेवा. भगर मध्ये आवश्यक असल्यास नंतर थोडे पाणी घालून शकतो.

  4. 4

    भगर शिजत आली की त्यात लिंबू पिळा. आपली भग र तयार आहे.

  5. 5

    आता गॅसवर दुसऱ्या भांड्यामध्ये तूप टाका.यात जीरे व मिरच्या घाला.आता यात दाण्याचा कूट घाला. चांगला परतून घ्या. आता यात भिजत घातलेले कोकम कुस्करून घाला.

  6. 6

    आता यात गूळ घाला व मीठ घाला. चांगली उकळू द्या. गरम गरम भगरी सोबत सर्व्ह करा.सोबत उपासाची चटणी,हिरवी मिरची तोंडी लावायला घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Rohini Deshkar
Rohini Deshkar @cook_24641154
रोजी
cooking and serving with love is my passion.
पुढे वाचा

Similar Recipes