कापण्या (kapnya recipe in marathi)

स्मिता जाधव
स्मिता जाधव @cook_24266122
डोंबिवली

#कुकस्नॅप
Nilan Raje
कापणी हा एक पदार्थ आहे हे अजूनपर्यंत मला माहित नव्हतं. कापणी हा शब्द शेताशी संबंधीत आहे एवढच माहीत होतं. पण थँक्स टू अंकिता मॅडम् त्यांच्यामुळे समजलं कापणीविषयी आणि गूगलवर पण खूप माहिती मिळाली कापणीबद्दल. मग मनात आलं कूकपॅडवरच्या एका तरी मैत्रिणीने नक्की बनवली असणार ही रेसिपी. कूकपॅडवर शोधलं तेव्हा निलन राजे यांची कापणीची रेसिपी मला मिळाली. कुकस्नॅप म्हणून मी त्यांची रेसिपी बनवली.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 2 कप(300 ग्राम)गव्हाचे पीठ
  2. 1 कपपाणी
  3. 1 कप(१५० ग्राम)गूळ(
  4. 2 टेबलस्पूनबेसन
  5. 1 टिस्पून सुंठ पावडर
  6. 1 टिस्पून वेलची पावडर
  7. चवीनुसारमीठ
  8. 2 टेबलस्पूनतेलाचे मोहन
  9. तळण्यासाठी तेल
  10. 1 टेबलस्पूनखसखस
  11. 1 टेबलस्पूनपांढरे तिळ

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम १ कप पाणी गॅसवर गरम करा. त्यामध्ये गूळ वितळवून घ्या आणि थंड करत ठेवा.

  2. 2

    गूळ मिश्रित पाणी थंड झाल्यावर एका परातीत २ कप गव्हाचे पीठ घ्या. चवीनुसार मीठ टाका. २ चमचे बेसन टाका. सुंठ पावडर आणि वेलची टाका. २ चमचे तेल तडका पॅनमध्ये कडकडीत गरम करा.

  3. 3

    तेलाचे कडकडीत मोहन पीठामध्ये ओता. सर्व तेल पीठामध्ये सावकाश मिक्स करा. मग गूळाचे पाणी घालून पीठ घट्टसर मळून घ्या आणि अर्धा तास झाकून बाजूला ठेवून द्या.

  4. 4

    अर्ध्या तासाने गॅसवर कढईत तेल गरम करत ठेवा. आता कापण्या करायला घ्या. पोळपाटावर पीठाचा एक गोळा घेऊन त्याची जाडसर चपाती लाटा आणि काचणीने शंकरपाळी सारखा आकार द्या. गरम तेलात कापण्या तळून घ्या.

  5. 5

    झाल्या खुसखुशीत कापण्या तयार. थंड झाल्यावर डब्यात भरून ठेवा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
स्मिता जाधव
रोजी
डोंबिवली

Similar Recipes