मेथी कोथिंबीर थालीपीठ (Methi Kothimbir Thalipeeth Recipe In Marathi)

Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
India

मेथी कोथिंबीर थालीपीठ (Methi Kothimbir Thalipeeth Recipe In Marathi)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
4 सर्व्हिंग्ज
  1. 2 कपथालीपीठ भाजणी
  2. 1 कपमेथी बारीक चिरून
  3. 1/2 कपकोथिंबीर बारीक चिरून
  4. 2कांदे बारीक चिरून
  5. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  6. 1 टीस्पूनधणे पावडर
  7. 1/2 टीस्पूनजीरे पावडर
  8. 1 टीस्पूनहळद
  9. 1/2 टीस्पूनहिंग
  10. 1 टीस्पूनसाखर
  11. मीठ चवीनुसार
  12. पाणी गरजेनुसार
  13. तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    प्रथम तयारी करून घ्यावी. आता थालीपीठ भाजणी परातीत घ्या. त्यात मेथी, कोथिंबीर, कांदा हे सगळे बारीक चिरून घालून घ्या. आता त्यात,मीठ चवीनुसार, साखर, लाल तिखट, हिंग, हळद, धणे पावडर, जीरे पावडर घाला. नी व्यवस्थित मिक्स करून घ्या.

  2. 2

    आता त्यात गरजेनुसार पाणी घाला आणि गोळा मळून घ्या. त्या पिठाचे समान गोळे करून घ्या.

  3. 3

    तवा तापवत ठेवा. तेलाने ग्रीस करून घ्या.
    बटर पेपर चा चौकोनी तुकडा घ्या. त्याला तेल लावा. नंतर एक गोळा घेऊन तो थापून घ्या. त्याला मध्ये भोक पाडून घ्या.

  4. 4

    तव्यावर थालीपीठ घाला. दोन्ही बाजूने खरपूस भाजून घ्या.

  5. 5

    दही, लोणचं, इ... बरोबर आस्वाद घ्या. गरम गरम सर्व्ह करा.

  6. 6
रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sampada Shrungarpure
Sampada Shrungarpure @cook_24516791
रोजी
India
Passionate about cooking. Like to learn more innovative recipes ...
पुढे वाचा

Similar Recipes