मेथी- कोथिंबीर पोहा कटलेट (methi kothimbir poha cutlets recipe in marathi)

Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
Mumbai

#cpm4
पोह्या पासून आपण अनेक नाश्त्याचे प्रकार बनवू शकतो जे करायलाही सोपे असतात. आज मी आपल्याला मेथी पोहा कटलेट रेसिपी सांगणार आहे ज्यामध्ये पोह्याच्या बरोबर घरामध्ये असलेली विविध प्रकारची पीठे वापरली आहेत त्यामुळे हा नाश्ता पौष्टिकही झालेला आहे. भाज्या वापरून आपण कटलेट करतोच पण आज मी मेथी आणि कोथिंबीर या फक्त दोन भाज्यांचा वापर करून हे कटलेट बनवले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-15 मिनिटे
3 सर्व्हिंग्ज
  1. 1 कपजाडे पोहे
  2. 1/2 कपचिरलेली कोथिंबीर आणि मेथी
  3. 2 टेबलस्पूनथालिपीठाची भाजणी
  4. 2 टेबलस्पूनवड्याचे पीठ
  5. 2 टेबलस्पूनतांदळाचे पीठ
  6. 2 टेबलस्पूनबेसन
  7. 1/2 टीस्पूनओवा
  8. 1 टेबलस्पूनतिखट
  9. 1/2 टीस्पून हळद
  10. 1 टीस्पूनआमचूर पावडर
  11. मीठ चवीनुसार
  12. कॉर्नफ्लॉवर पेस्ट आणि बारीक रवा एक्स कोटिंग साठी
  13. तेल

कुकिंग सूचना

10-15 मिनिटे
  1. 1

    जाडे पोहे चाळणीत घेऊन दोन वेळा पाण्याने स्वच्छ धुऊन घ्या आणि नंतर एका भांड्यामध्ये ते पोहे घेऊन त्यामध्ये अर्धा कप पाणी घालून दहा ते पंधरा मिनिटे बाजूला ठेवून द्या. यामुळे पोहे चांगले नरम होतील आणि फुलतील. हाताने हे पोहे चांगले कुस्करून घ्या.

  2. 2

    पोह्यामध्ये बारीक चिरलेली मेथी आणि कोथिंबीर वर दिलेली सर्व पीठे, मसाले ओवा हाताने चुरून व मीठ चवीनुसार घाला. हे मिश्रण हाताने व्यवस्थित एकत्र करून घ्या फोडणीच्या पळीत मधे दोन टेबल्स्पून तेल घेऊन कडकडीत गरम करा आणि ते या मिश्रणात मोहन म्हणून घाला.

  3. 3

    आता हे मिश्रण व्यवस्थित एकत्र करून हाताने मळून त्याचा गोळा तयार करा आणि तुम्हाला हव्या त्या आकाराचे साचा वापरून कटलेट बनवून घ्या. कढईमधे तेल तापायला ठेवा आणि कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमध्ये बुडवून आणि रव्यामध्ये घोळवून कटलेट तळून घ्या.

  4. 4

    मी या कटलेट बरोबर खाण्यासाठी म्हणून गार्लिक मेयोनिज आणि टोमॅटो सॉस एकत्र करून त्यामध्ये ओरेगानो आणि चिली फ्लेक्स घालून एक डीप बनवला आणि त्याच्याबरोबर हे कटलेट गरम गरम सर्व केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pradnya Purandare
Pradnya Purandare @pradnya_dp
रोजी
Mumbai
Easy serv in busy life.. Haveeka
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes