चित्रान्न (Chitranna Recipe In Marathi)

Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
Mumbai

#RRR चित्रान्न हा भाताचा दाक्षिणात्य पदार्थ असून खुप चविष्ट लागतो.एखाद्या जेवणातही चालतो.(लंच डिनर) साहित्य आपल्या घरात उपलब्ध असते.जरुर करून पहा.

चित्रान्न (Chitranna Recipe In Marathi)

#RRR चित्रान्न हा भाताचा दाक्षिणात्य पदार्थ असून खुप चविष्ट लागतो.एखाद्या जेवणातही चालतो.(लंच डिनर) साहित्य आपल्या घरात उपलब्ध असते.जरुर करून पहा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

15 मिनिटे
2 सर्व्हिंग्ज
  1. 1 मोठी वाटी तांदूळ
  2. 1 टेबलस्पूनचिवड्याच्या डाळ्या
  3. 1 टेबलस्पूनशेंगदाणे
  4. 15-16काजू
  5. 1 टिस्पून उडीद डाळ
  6. 2हिरव्या मिरच्या तुकडे
  7. 7-8पाने कढिपत्ता
  8. कोथिंबीर बारीक चिरून
  9. 1/2 टिस्पून सांबार मसाला
  10. मीठ, हळद, मोहरी गरजेनुसार
  11. तेल गरजेनुसार
  12. 1/2‌लिंबुरस

कुकिंग सूचना

15 मिनिटे
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुवून दुप्पट पाणी घालून मोकळा भात शिजवून घ्या.मोकळा करुन ठेवा.ई

  2. 2

    कढईत थोडेसे तेल तापवून त्यात शेंगदाणे, काजू, खोबरे काप उडीद, डाळ,डाळ्या तळून बाजूला ठेवा.

  3. 3

    कढईत तेल तापवून त्यात मोहरी घाला.मिरची तुकडे, कढिपत्ता, हळद घालून परतावे.मोकळ्या केलेल्या भातात मीठ आणि सांबार मसाला घालून एकजीव करून घ्या.हा भात तेलात मिसळून घ्या.

  4. 4

    तळलेले पदार्थ घालून एकजीव करून लिंबू रस घाला.छान एकजीव करून कोथिंबीर पेरा.गरम भात सर्व्ह करा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Pragati Hakim
Pragati Hakim @cook_21873900
रोजी
Mumbai

टिप्पण्या

Similar Recipes