लसुण भात (Lasun Bhaat Recipe In Marathi)

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

#VNR
आरोग्यासाठी चांगला असलेला हा भात आहे.
ज्यांना लसूण खायला सांगितलेला आहे. अशांसाठी ही रेसिपी खूप मस्त आहे. झटपट हा भात होतो.
उरलेल्या शिळ्या भाताचाही तुम्ही हा भात बनवू शकता.

लसुण भात (Lasun Bhaat Recipe In Marathi)

#VNR
आरोग्यासाठी चांगला असलेला हा भात आहे.
ज्यांना लसूण खायला सांगितलेला आहे. अशांसाठी ही रेसिपी खूप मस्त आहे. झटपट हा भात होतो.
उरलेल्या शिळ्या भाताचाही तुम्ही हा भात बनवू शकता.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10 मिनिटे
3-4 जणांसाठी
  1. 1 कपतांदूळ
  2. 1/4 कपलसूण पाकळ्या
  3. 1 टीस्पूनजीरे
  4. 1/2 टीस्पूनकाळीमिरी पावडर
  5. 4हिरव्या मिरच्या
  6. थोडी कोथिंबीर
  7. 1/2लिंबाचा रस
  8. चवीप्रमाणे मीठ
  9. 1-2 टेबलस्पूनतेल

कुकिंग सूचना

10 मिनिटे
  1. 1

    तांदूळ स्वच्छ धुऊन त्याचा मोकळा भात करून घेणे.ताटलीत काढून, थंड करून घेणे.
    तुमच्या आवडीनुसार कोणत्याही तांदूळ घेऊ शकता. फक्त भात थोडा मोकळा शिजवून घेणे.हिरवी मिरचीचे तुकडे करून घेणे. बारीक चिरून घेणे. कोथिंबीर बारीक चिरून घेणे.

  2. 2

    गॅसवर कढईत तेल घालून तापत ठेवणे.तेल तापले की गॅस मध्यम आचेवर ठेवावा. जीरे घालून ते फुलले की लसणाचे बारीक केलेले तुकडे घालणे व ते किंचित लालसर व्हायला लागले की मिरच्यांचे तुकडे घालून परतणे. *लसूण जास्त लालसर करायचा नाही.

  3. 3

    मिरच्या परतून झाल्या की लगेच भात घालून मिक्स करून घेणे. वरून चवीप्रमाणे मीठ बेतानेच घालणे.कारण आधी आपण भात शिजवताना थोडेसे मीठ घातलेले आहे. काळीमिरपूड घालून व्यवस्थित भात मिक्स करून घेणे.

  4. 4

    वरून चिरलेली कोथिंबीर घालून घेणे व गॅस बंद करणे. तसेच अर्ध्या लिंबाचा रस घालून व्यवस्थित मिक्स करून घेणे. खाण्यासाठी तयार लसूणी भात. गरमागरम खूप छान लागतो.
    या भातात तुम्ही सिमला मिरची घालू शकता,आवडत असल्यास. (माझ्याकडे नव्हती म्हणून मी घातली नाही.)

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes