तळणीचे मोदक(Talniche Modak Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

आज संकष्टी म्हटलं की गणपतीच्या आवडीचे मोदक घरोघरी केले जातात. उकडीचे आणि तळणीचे दोन्ही मोदक संकष्टीला केले जातात. तसं पाहिलं तर मोदकाचे अनेक प्रकार आहेत पण हे दोन प्रकार संकष्टीला आवर्जून बाप्पा साठी नैवेद्याला केले जातात.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१०
३० मिनिटे
  1. 1 वाटी मैद्याच्या चाळणीने चाळून गव्हाचे पीठ
  2. 1 वाटीसुके खोबरे खमंग भाजून
  3. 1 छोटी वाटी सर्व प्रकारचे ड्रायफ्रूट्स खमंग भाजून व बारीक करून
  4. 1 चमचावेलची पावडर
  5. 1/2 वाटीपिठीसाखर
  6. मोदक करण्यासाठी गरजेप्रमाणे तूप
  7. मीठ आवश्यकतेनुसार

कुकिंग सूचना

१०
  1. 1

    प्रथम गव्हाचे पिठात मीठ आणि थोडे साजूक तूप घालून पीठ घट्ट मळून दहा मिनिट झाकून ठेवावे.

  2. 2

    नंतर वरील सारणाचे, सर्व साहित्य एकत्र करून सारण तयार करून घ्यावे.

  3. 3

    नंतर गव्हाच्या पिठाच्या छोट्या पुऱ्या लाटून घ्याव्यात आणि तयार केलेले सारण त्यात भरून छान सुबक मोदक तयार करून घ्यावेत.

  4. 4

    तूप गरम झाल्यानंतर गॅस बारीक करून तयार केलेले मोदक टोक खालच्या बाजुने अशा प्रकारे प्रथम तुपात टाकावेत आणि नंतर त्यावर तूप झाऱ्याने वरून टाकत सर्व बाजूंनी तांबूस रंगात खमंग तळून घ्यावेत आणि एका बाऊलमध्ये ठेवून बाप्पाला 21 मोदकांचा नैवेद्य श्रद्धायुक्त भावाने अर्पण करावा आणि आपण त्याचा प्रसाद ग्रहण करावा.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes