ग्रीन उंधियू (Green Undhiyu Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

#NVR
हिरवी लसणाची पात, कोथिंबीर व भाज्या वापरून केलेला हा उंधियू टेस्टी होतो

ग्रीन उंधियू (Green Undhiyu Recipe In Marathi)

#NVR
हिरवी लसणाची पात, कोथिंबीर व भाज्या वापरून केलेला हा उंधियू टेस्टी होतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

50मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. हिरव्या लसणाच्या पातीच्या चार जूड्या त्याची लसणाची पात व लसूण वेगळा करून घ्यायचा व धुवून ठेवायचा. लसणाची बात बारीक कापून ठेवायची व लसूण जाडसर वाटून ठेवायचा
  2. 1भांड छोटं भरून धुऊन चिरलेली कोथिंबीर
  3. 1 वाटीखोवलेलं ओलं नारळ, दोन चमचे दाण्याचा कूट, एक चमचा तिळाचा कूट
  4. मोठे दीड टेबलस्पून 20 मिरच्या व दीड इंच आल्याचं जाडसर पेस्ट
  5. 2मध्यम साईजचे बटाटे,दोन रताळे दोन केळी पिकलेली,दोन कंद, चार वांगी मध्यम साईझ ची हिरवी व सुरती पापडी पाव किलो
  6. 1/2 चमचाहळद,अर्धा चमचा तिखट, चमचा गरम मसाला
  7. 2 वाटीमेथी धुऊन बारीक कापलेली दीड वाटी कणिक, पाऊण वाटी बेसन
  8. चवीनुसारमीठ, तीन चमचे साखर
  9. 1लिंबाचा रस
  10. तळण्यासाठी तेल
  11. 2 टेबलस्पूनतेल
  12. 1/4 चमचाछोटा, चिमूटभर सोडा
  13. 1/2 चमचाओवा, अर्धा चमचा तीळ

कुकिंग सूचना

50मिनिट
  1. 1

    प्रथम मेथीच्या भाजीमध्ये मीठ मिरची व आल्याचे जाडसर वाटण थोडीशी कोथिंबीर, थोडंसं कापलेला हिरवा लसणाची पात,ओवा,तीळ थोडसं तेल कणिक,बेसन, सोडा,हळद थोडीशी साखर सगळं एकत्र कालवून त्याला अगदी पाणी शिंपडावं व त्याचे गोळे करावे व गरम तेलामध्ये तळून काढावेत आपल्या मुठिया तयार झाल्यात

  2. 2

    आता त्याच तेलामध्ये बटाटे कंद व रताळे यांच्या साल काढून केलेल्या मोठ्या फोडी तळून घ्याव्यात व ताटात काढून ठेवाव्यात

  3. 3

    ओल्या खोबऱ्यामध्ये दाण्याचा कूट तीळकूट, हळद तिखट मसाला,कापलेलं लसणाची हिरवी पात,मिरची आल्याचं वाटण थोडीशी जाडसर वाटलेला लसूण पातीचा,साखर मीठ, ओवा,लिंबाचा रस व 2मुठीया कुस्करून घालून एकजीव करावं व हे वाटण केळीचे मोठ्या फोडी करून त्याला चीर पाडावी व त्याच्यात भरावे नंतर सेम वांग्यांच्या चिर पाडून त्याच्यात भरावे व जे तळलेलं कंद आणि बटाटे हे त्याला थोडंसं मसाला लावावा हाच उरलेला मसाला तसाच भांड्यात ठेवावा

  4. 4

    आता मोठी कढई घेऊन त्यामध्ये तेल घालावे नंतर लसणाच्या पातीचा ठेचलेला लसूण घालावा व हिंग घालावं लसूण लालसर आणि कच्चेपणा गेला की त्यामध्ये पापडी व उरलेला मसाला व भरलेले वांगे घालून छान परतावे व गरम पाणी टाकून छान वाफ येऊ द्यावी ते शिजत आले असं वाटलं की त्याच्यामध्ये मसाला लावून ठेवलेले व तळलेले सगळे कंद बटाटे रताळे घालावे त्याच्यावर भरून ठेवलेले केळी घालावी त्यानंतर मुठिया घालाव्यात व लागेल तसं गरम पाणी घालून झाकून मंद गॅसवर शिजत ठेवावे एक दहा मिनिटात सगळं रेडी होतं गॅस बंद करावा सगळे एकजीव करावं

  5. 5

    यावर लसणाच्या पातीने गार्निश करून गरम पुरी बरोबर चपाती बरोबर खायला द्यावे अतिशय टेस्टी व सुंदर असं उंधियु तयार होतं

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes