मिक्स व्हेज फ्रँकी (Mixed Veg Frankie Recipe In Marathi)

Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
ठाणे

सगळ्या भाज्या वापरून चीज वापरून केलेली ही फ्रँकी मोठ्यांना मुलांना सगळ्यांनाच खूप आवडेल

मिक्स व्हेज फ्रँकी (Mixed Veg Frankie Recipe In Marathi)

सगळ्या भाज्या वापरून चीज वापरून केलेली ही फ्रँकी मोठ्यांना मुलांना सगळ्यांनाच खूप आवडेल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

40मिनिट
6 सर्व्हिंग्ज
  1. 1 मोठा वाटी भरून ब्रोकली बारीक कापलेली,त्याच्या निम्मे कॉर्न चे दाणे, दोन कांदे उभे चिरलेले, दोन टोमॅटो उभे चिरलेले,एक वाटी भरून ऑलिव्ह
  2. 1 चमचामिरी पावडर,चवीनुसार मीठ
  3. 1/2 वाटीटोमॅटो हॉटेल स्वीट सॉस,1 वाटी मेयोनेज
  4. 6चपाती करतो तेवढे कणकेचे गोळे
  5. रेड बेल पेपर उभं चिरलेलं
  6. 1मोठी वाटी भरून चीज
  7. 1/2 वाटीबटर
  8. 1 टेबलस्पूनऑलिव्ह ऑइल
  9. 1 टीस्पूनचिली फ्लेक्स,1 टीस्पून मिक्स हर्ब

कुकिंग सूचना

40मिनिट
  1. 1

    आधी फ्राय पण गॅसवर ठेवून त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल घालून त्यामध्ये ब्रोकोलीकॉर्नचे दाणे व रेड बेल पेपर घालून त्यामध्ये मिरी पावडर व मीठ घालून चार मिनिटासाठी मोठ्या गॅसवर परतावे मग त्यामध्ये कांदा टोमॅटो घालून अजून दोन मिनिटांसाठी परतावे मग शेवटी त्यामध्ये ऑलिव्हज घालून गॅस बंद करावा व भाजी थंड होऊ द्यावी

  2. 2

    चपात्या करून घ्याव्या व त्या हलक्या भाजून घ्यावा चपाती भाजताना दोन्ही साईडने त्याला बटर लावावे मग मंद गॅसवर नॉनस्टिकचा तवा ठेवून

  3. 3

    त्यावर एक चपाती ठेवावी व गॅस मंद ठेवावा अधिनियमित सॉस लावावे त्याच्यावर तयार झालेली भाजी घालावी मग त्याच्यावर चीज घालावे त्यावर चिली फ्लेक्स मिक्स हेर्ब घालावे मग दोन्ही साईडला दुमडून पोळीचा रोल करावा व बटर घालून तो दोन्ही साईडने खमंग

  4. 4

    अशाच रीतीने सर्व फ्रांकी करून ती मध्ये कापावी व गरम गरम खायला द्यावी त्याबरोबर आपण सॉस खाऊ शकतो पण नुसती सुंदर लागते कारण त्यामध्ये सर्व असतं अतिशय हेल्दी व टेस्टी अशा मिक्स व्हेजिटेबल फ्रँकीस तयार होतात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Charusheela Prabhu
Charusheela Prabhu @charu81020
रोजी
ठाणे
☺️be Happy and keep smiling always😊
पुढे वाचा

Similar Recipes