कोबी कांदा भजी (Kobi Kanda Bhajji Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

#WWR
गरमागरम या शब्दाबरोबर जर कुठल्या शब्द परफेक्ट जुळत असेल तर ते म्हणजे भजी. कुठल्याही प्रकारची भजी चांगलीच लागतात. थंडीच्या दिवसात बाजारात खूप प्रकारच्या भाज्या म्हणजे पालेभाज्या मिळतात त्या सर्वांची भजी सुद्धा अतिशय सुंदर लागतात त्याचबरोबर शेवग्याच्या फुलांची किंवा पानाची भजी सुद्धा अतिशय चविष्ट लागतात. पण जेव्हा पटकन भजी खायची हौस येते तेव्हा घरात कांदा आणि कोबी नेहमीच उपलब्ध असतो.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

२० मिनिटे
  1. 2 कपलांबट कापलेला कोबी
  2. 2कांदे उभे पातळ चिरून
  3. 2हिरव्या मिरच्या बारीक कापून
  4. 1 चमचाभाजलेल्या धण्याचा भरडा
  5. 1 चमचालाल तिखट
  6. 1/4 चमचाहळद
  7. 1छोटी वाटी बारीक कापलेली कोथिंबीर
  8. 2 वाट्याभाजलेल्या चना डाळीचे जाडसर दळलेले बेसन
  9. मीठ आवश्यकतेनुसार
  10. 1/4 लिटरतेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

२० मिनिटे
  1. 1

    प्रथम सर्व साहित्य एका पसरट मोठ्या बाऊलमध्ये एकत्र करून घ्यावे, त्यात एक टेबलस्पून गरम तेल आणि दोन चिमटी खायचा सोडा टाकावा.

  2. 2

    कढईमध्ये तळण्यासाठी तेल गरम करत ठेवावे आणि एकदा गरम झाल्यावरती गॅस मध्यम ठेवून आपल्याला आवडतील त्या छोट्या किंवा मोठ्या आकाराची भजी तळून घ्यावी.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

Similar Recipes