मेथी आलु पराठा (methi aloo paratha recipe in marathi)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
Kalyan

#EB1 #W1 #रेसिपी इ बुक चॅलेंज1 थंडीच्या सिजन मध्ये पालेभाज्या मुबलक प्रमाणात मिळतात. यात मेथी एक खास पालेभाजी आहे. मेथीची भाजी खाणे आरोग्यासाठी खुपच फायदेशीर आहे. मेथी चविला थोडी कडसर लागते पण गुणकारी आहे म्हणुन त्याचे वेगवेगळे पदार्थ बनवुन आपण लहान मोठ्यांना देवु शकतो. मेथी खाल्ल्याने वजन कमी होण्यास मदत होते. यात फायबर सोबतच अनेक पोषक तत्वे असतात. पोटाचा घेर कमी होण्यास मदत होते. मेथी मधुमेह रोधक आहे . त्वचेवरही गुणकारी तसेच केसांनाही फायदा होतो. पचनाच्या समस्याही मेथी सेवनाने निवारण होतात. चला तर अशा बहुगुणकारी मेथीची वेगळी रेसिपी बघुया हि सर्वजण आवडीने खातात

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१/२ तास
२-३ जणांसाठी
  1. १०० ग्रॅम मेथी
  2. २०० ग्रॅम गव्हाचे पिठ
  3. ५० ग्रॅम बेसनपीठ
  4. 1 टीस्पूनजीरे
  5. 1/2 टीस्पूनआमचुर पावडर
  6. 1/2 टीस्पूनगरम मसाला
  7. 1/2 टीस्पूनहळद
  8. 1/2 टीस्पूनचिलिफ्लेक्स
  9. 1मिरची
  10. 3-4मध्यम उकडलेले बटाटे
  11. 2 टेबलस्पुनदही
  12. चविनुसारमीठ
  13. 1 टेबलस्पुनतेल
  14. २-४ टेबलस्पुन साजुक तुप किंवा बटर
  15. २० ग्रॅम केचप

कुकिंग सूचना

१/२ तास
  1. 1

    मेथी आलु पराठ्या साठी लागणारे साहित्य काढून ठेवा सर्व साहित्य मोठ्या बाऊलमध्ये किंवा परातीत मिक्स करून गोळा मळुन घ्या(मेथी थोड़ी चिरून वापरा) दहीचा वापर करा

  2. 2

    सर्व साहित्य मिक्स करून घट्ट गोळा मळुन ठेवा व१०-१५ मिनिटे तेल लावुन झाकुन ठेवा पराठे करताना परत तेल लावुन मळुन घ्या

  3. 3

    १ गोळा घेऊन पिठावर लाटुन घ्या व त्याला तेल लावुन व थोड पिठ भुरभुरून फोल्ड करून ठेवा

  4. 4

    सर्व लाट्या बनवुन ठेवा तवा गरम करायला ठेवा व जाडसर पराठा लाटा व दोन्ही बाजुने तुप लावुन खमंग भाजा

  5. 5

    गरमागरम तुप लावलेले पराठेप्लेट मध्ये सर्व्ह सोबत केचप किंवा गोड दही देता येईल

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
रोजी
Kalyan

टिप्पण्या (2)

Chhaya Paradhi
Chhaya Paradhi @Chhaya12_1962
धन्यवाद आर्याताई, ज्योस्ना🙏🙏

Similar Recipes