एग रामेन (Egg Ramen Recipe In Marathi)

Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519

सकाळी रोज नवीन नाश्ता काय करावा हा प्रश्न प्रत्येक गृहिणीला असतोच.कितीहि प्रकार असले तरी वेगळं काहीतरी पौष्टिक आणि तरीही हलकफुलक आणि घरातील सगळ्यांना आवडणार असं काहीतरी करण्यासाठी गृहिणी नेहमीच शोधात असते. हा प्रकार पाश्चात्य जरी असला तरी सर्वांना आवडण्यासारखा आणि चविष्ट आणि पौष्टिक या दोन्ही गरजा पूर्ण करण्यासारखा आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
  1. 4अंडी उकडून
  2. 2 बाउलउकडलेली मटकी
  3. 3 बाउलव्हेजिटेबल स्टॉक
  4. 2 वाट्याशिजवलेल्या नूडल्स
  5. 2 टेबल स्पूनबारीक चिरलेली लसूण
  6. 1 चमचामिरची पावडर
  7. 1 छोटी वाटी पनीर क्यूब
  8. 1 छोटी वाटी टोमॅटो प्युरी
  9. 2 चमचेबारीक चिरलेली कोथिंबीर
  10. मीठ आवश्यकतेनुसार
  11. 2क्यूब बटर
  12. 1 चमचातेल नूडल्स शिजवताना टाकण्यासाठी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    प्रथम पाण्यामध्ये मीठ आणि तेल घालून नूडल्स नीट शिजवून घ्याव्यात. कांदा टोमॅटो कोथंबीर आणि घरातील इतर काही भाज्या घालून वेजिटेबल ब्रोथ किंवा वेजिटेबल स्टॉक बनवून घ्यावा.

  2. 2

    सोया सॉस,मिरची पावडर आणि मीठ पनीर मध्ये मिक्स करून मॅरीनेशन करून ठेवावे. थोड्याशा बटरमध्ये बारीक चिरलेली लसूण तांबूस करून त्यातउकडलेली मटकी व आवश्यकतेनुसार मीठ घालून बाजूला ठेवावे.

  3. 3

    नंतर गरजेप्रमाणे चार बाउल घेऊन त्यात सर्वात प्रथम शिजवलेल्या नूडल्स, त्यावर व्हेजिटेबल ब्रोथ,त्यावर परतून घेतलेली मटकी, एका बाजूला मॅरीनेट केलेलं पनीर, आणि दुसऱ्या बाजूला उकडलेली अंडी अर्धी कापून ठेवावी आणि वरून कोथिंबिरीने सजवून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Anushri Pai
Anushri Pai @Anu_29184519
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes