मिक्स भाज्यांचे थालीपीठ

Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995

बऱ्याच वेळा मुले काही पालेभाज्या व काही फळभाज्या खात नाही, तर त्यांच्या पोटात कसे जातील. यासाठी हे थालीपीठ आहे.
पौष्टिक पोटभरीचे असे हे थालीपीठ आहे. सर्वांसाठी नक्कीच ते चांगले आहे.

मिक्स भाज्यांचे थालीपीठ

बऱ्याच वेळा मुले काही पालेभाज्या व काही फळभाज्या खात नाही, तर त्यांच्या पोटात कसे जातील. यासाठी हे थालीपीठ आहे.
पौष्टिक पोटभरीचे असे हे थालीपीठ आहे. सर्वांसाठी नक्कीच ते चांगले आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20-25 मिनिटे
3 जणांसाठी
  1. 1/2 वाटीगव्हाचे पीठ
  2. 1/2 वाटीबेसन पीठ
  3. 1/2 वाटीज्वारीचे पीठ
  4. 1/4 वाटीपालक
  5. 1/4 वाटीमेथी
  6. 1/4 वाटीकोथिंबीर
  7. प्रत्येकी 2 टेबलस्पून गाजर,कोबी,काकडी,बीट, दुधी भोपळा
  8. 1.1/2 टेबलस्पून ओवा, मेथी व जिरे यांची पावडर
  9. 1 टेबलस्पूनतीळ
  10. 1/4 टीस्पूनहिंग
  11. 1.1/2 टेबलस्पून आलं, लसूण, हिरवी मिरची यांची पेस्ट

कुकिंग सूचना

20-25 मिनिटे
  1. 1

    सर्व भाज्या स्वच्छ धुवून चिरून घेणे. काकडी,गाजर, दुधी भोपळा,कोबी,बीट यांची सालं काढून, किसून घेणे.
    सर्व मसाले घेणे.
    एका बाऊलमध्ये गव्हाचे पीठ, ज्वारीचे पीठ व बेसन पीठ एकत्र करून घेणे.

  2. 2

    चवीप्रमाणे मीठ घालून घेणे. तसेच सर्व मसाले घालून घेणे.ओवा हातावर चोळून घालावा. व्यवस्थित मिक्स करून घेणे.

  3. 3

    चिरलेल्या व किसलेल्या सर्व भाज्या पिठात घालून घेणे. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणे. भाज्यांना सुटलेल्या पाण्यामध्येच आधी मळून घेणे. नंतर लागेल तसे थोडे थोडे पाणी घालून पीठ मळून घेणे.

  4. 4

    पीठ थोडे सैलसर ठेवावे. गॅसवर तवा तापत ठेवावा. तवा तापला की त्याला थोडेसे तेल लावावे. पिठाचा एक छोटा गोळा घ्यावा.

  5. 5

    तव्यावर गोळा टाकून थापावा. एका बाऊलमध्ये पाणी घेऊन ठेवावे. पाण्याच्या हात लावून तव्यावर व्यवस्थित थापून घ्यावे. आपल्याला जेवढे लहान मोठे हवे तसे आपण थापून घ्यावे. कडेने तेल सोडावे. वरची बाजू थोडी कोरडी होत आली की उलटून दुसरी बाजू भाजून घ्यावी. पुन्हा कडेने थोडेसे तेल सोडावे.

  6. 6

    अशाप्रकारे सर्व थालीपीठ करून घेणे. लोणचे, दही, टोमॅटो केचप कशाबरोबरही तुम्ही खाऊ शकतात. बेटामुळे त्याला लाल रंग येतो

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Sujata Gengaje
Sujata Gengaje @cook_24422995
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes