दुधीभोपळ्याचे ठेपले (dudhibhoplyache theple recipe in marathi)

ठेपले रेसिपी
ठेपले हा पदार्थ गुजरातचा आहे. वेगवेगळ्या भाज्यांचे ठेपले बनले जातात. कोणी ठेपले किंवा धपाटे, पराठे असे नाव देतात. लहान मुले भाजी खात नाही त्यांना असे भाजी घालून केलेले ठेपले दिले तर ते आनंदाने खातात. तसेच नाष्टा साठी ही पौष्टिक असे ठेपले केले जातात. प्रवासासाठी ही हे ठेपले घेऊन जाता येतात. हे ठेपले 2 ते 3 दिवस छान राहतात. मी आज दुधीभोपळ्याचे पौष्टिक ठेपले रेसिपी पोस्ट करत आहे. कसे झाले ते सांगा.
दुधीभोपळ्याचे ठेपले (dudhibhoplyache theple recipe in marathi)
ठेपले रेसिपी
ठेपले हा पदार्थ गुजरातचा आहे. वेगवेगळ्या भाज्यांचे ठेपले बनले जातात. कोणी ठेपले किंवा धपाटे, पराठे असे नाव देतात. लहान मुले भाजी खात नाही त्यांना असे भाजी घालून केलेले ठेपले दिले तर ते आनंदाने खातात. तसेच नाष्टा साठी ही पौष्टिक असे ठेपले केले जातात. प्रवासासाठी ही हे ठेपले घेऊन जाता येतात. हे ठेपले 2 ते 3 दिवस छान राहतात. मी आज दुधीभोपळ्याचे पौष्टिक ठेपले रेसिपी पोस्ट करत आहे. कसे झाले ते सांगा.
कुकिंग सूचना
- 1
प्रथम दुधी भोपळा स्वच्छ धून त्याचे साली काढून घेणे. नंतर किसणीने तो खिसुन घेणे. तो खिस हाताने अलगद दाबून त्यातील पाणी पिळून काढावे. व त्यात हळद, तिखट, धने पूड, ओवा, तीळ, 2 चमचे तेल आणि भरपूर कोथिंबीर, चवीनुसार मीठ घालून तो खिस हलवून घेणे. व 10 मिनिट झाकून ठेवावा.
- 2
नंतर त्या किसलेल्या भोपळ्या मध्ये 3 चमचे बेसन पीठ, ज्वारीचे पीठ व कणिक समावेल इतकी मिक्स करावी व एकजीव करून त्याचा घट्टसर गोळा मळून घेणे. तवा गॅस वर ठेवून गरम होई पर्यंत तो गोळा झाकून ठेवावा आणि लगेचच ठेपले करायला घेणे. (पीठ सैल होते) मळलेल्या पिठाचे मध्यम असे गोळे करून ठेपला बनवण्यासाठी घेणे.
- 3
एक गोळा घेऊन तो कोरड्या पिठात घोळून घेऊन पातळ अशी पोळी लाटावी. लाटून झाली कि गरम झालेल्या तव्यावर ठेपला मस्त एका बाजूने थोडा भाजला कि तो पालटून घेणे व त्यावर ब्रश ने किंवा चमच्याने तेल किंवा तूप लावावे. अशाप्रकारे दोन्ही ही बाजू मस्त खमंग तूप किंवा तेल सोडून भाजून घेणे.
- 4
वरील प्रमाणे सर्व ठेपले लाटून मस्त खमंग भाजून घेणे. वरील साहित्यामध्ये साधारण 9 ठेपले बनवून होतात.
- 5
हे ठेपले दही, लोणचे किंवा टोमॅटो केचउप सोबत गरमागरम खावेत. मस्त खमंग आणि चविष्ट असे हे ठेपले लागतात.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
धपाटे (dhapate recipe in marathi)
धपाटे ही महाराष्ट्र् मराठवाड्यातील लोकप्रिय रेसिपी आहे. ज्वारीचे पीठ वापरून धपाटे केले जातात. धपाटे या नावातच त्या पदार्थाची कृती दडलेली आहे. धपाधप थापून केले जातात म्हणून धपाटे आसे नाव पडले आसावे धपाटे हा थालिपिठांशी मिळताजुळता पदार्थ आहे.लहानपणापासून माझा आवडीचा . धपाटे दही , शेंगदाणे चटणी, ठेचा सोबत छान लागतात. आमच्याकडे या मध्ये मेथीची भाजी किंवा कांद्याची पात पण घातली जाते. Ranjana Balaji mali -
दही धपाटे (dahi dhapate recipe in marathi)
#KS5#मराठवाडा स्पेशल दही धपाटेअगदी पोटभरीचा पदार्थ म्हणून याची ओळख आहे....प्रवासात पौष्टिक खाद्य पदार्थ नेण्यासाठी हे धपाटे उत्तम असतात चविष्ट तर असतातच पण बरेच दिवस टिकतात....बऱ्याच ठिकाणी करण्याची पद्धत वेगवेगळी आहे पण मराठवाड्यात खास ज्वारीच्या पीठा पासून केले जातात.....खूपच प्रचलित आहेत असे हे दही धपाटे....पाहुयात रेसिपी... Shweta Khode Thengadi -
मेथी पराठा (methi paratha recipe in marathi)
#ब्रेकफास्ट#मेथी_पराठामेथी ही पालेभाजी बहुगुणी आहे. नुसती भाजी खायला काही जणांना आवडत नाही. मग असे पराठे केले कि आवडिने खातात. मेथी पराठा रेसिपी खालील प्रमाणे 😊👇 जान्हवी आबनावे -
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (dudhi bhopdyache thalipeeth recipe in marathi)
#cooksnap#नीलम जाधव# दुधी भोपळ्याचे थालीपीठ नीलम मी तुझी ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे. खूप छान खुसखुशीत थालीपीठ झाले होते. खूप धन्यवाद नीलम 🙂🙏 Rupali Atre - deshpande -
ज्वारीचे धपाटे (Jwariche Dhapate Recipe In Marathi)
₹GR2#गावरान रेसिपी चॅलेंज# ज्वारीचे धपाटेधपाटे हे सगळ्यांनाच माहिती आहे आणि हे खुसखुशीत असे धपाटे मधल्या वेळेस किंवा रात्रीच्या जेवणासाठी एक फुल मिल म्हणून अगदी योग्य प्रकार आहे. पाच ते सहा दिवस राहतात तुम्ही याला प्रवासाला घेऊन जाऊ शकता. आता थंडी असल्यामुळे मी यात मेथी पण टाकली त्याच्यामुळे याचा स्वाद खूपच वेगळा लागतो. Deepali dake Kulkarni -
मेथी मटार स्टफ्ड पराठा (Methi Matar Stuff Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी लोकांच्या मध्ये पराठे हा प्रकार मोठ्या प्रमाणात केला जातो विविध भाज्यांचे पराठे सोबत दही चटणी लोणचे हे नाष्ट्यात आणि जेवणात सुद्धा बनवले जाते आज आपण बनवणार आहोत मेथी मटारचा स्टफड पराठा Supriya Devkar -
श्रीधान्य थालीपीठ (thalipeeth recipe in marathi)
#bfr ब्रेकफास्ट रेसिपीज्वारी,बाजरी,नाचणी,राजगिरा, राळ इ.धान्यांना श्रीधान्य म्हणतात.यांच्या पिठापासून पौष्टिक असे थालीपीठ बनवले आहे. यात पालक, कांदयाची पात घालून अजून पौष्टिक असे हे थालीपीठ बनवले.तुम्ही नक्की करून बघा. Sujata Gengaje -
मेथी ठेपले (methi thepla recipe in marathi)
#cooksnap #कल्पना चव्हाण # यांच्या रेसिपी मध्ये मी, दही वापरण्या ऐवजी, ताक वापरून पीठ भिजविले आहे.. बाकी छान झाले आहेत ठेपले... धन्यवाद... Varsha Ingole Bele -
मसाला रोटी (masala roti recipe in marathi)
#GA4 #week25 #Roti - कीवर्ड# मसाला रोटी (पराठा ) Rupali Atre - deshpande -
मराठवाडा स्पेशल धपाटे (dhapate recipe in marathi)
#मराठवाडा स्पेशल धपाटेमी ही रेसिपी प्राची मलठणकर यांची कूकस्नॅप केली आहे. खूप छान झालेले धपाटे. Sujata Gengaje -
फोडशीचे धपाटे (fodshiche dhapate recipe in marathi)
#msrपावसाळ्यात मिळणाऱ्या रानभाज्या पैकी फोडशीची भाजी.स्त्री पुरुष दोघांच्याही बऱ्याच आजारांवर अत्यंत उपयुक्त ,औषधी भाजी आहे. तिला श्वेत मुसळी असेही म्हणतात.त्याची भाजी,भजी,वडे ,वड्याअसेही अनेक पदार्थ बनवता येतात.मी फोडशीची भाजी ,ज्वारीचं पीठ, सत्तु चं पीठ वापरून पौष्टिक आणि चविष्ट असे धपाटे बनवले आहेत.खूपच छान झाले धपाटे. Preeti V. Salvi -
मेथीचे ठेपले (methichi theple recipe in marathi)
#GA4 #WEEK20 #KEYWORD_Theplaठेपला ह्या मूळ गुजराथी असलेल्या पदार्थाने मराठी घराघरात नक्कीच स्थान मिळवले आहे.करायला सोपा,रुचकर आणि भाजी-पोळी या दोन्हीची जागा घेतली आहे..मेथी बारा महिने मिळतेच पण थंडीत खूप चवदार लागते.थोडी पित्तकारक आहे तरीही antioxidant आणि डायबेटीस नियंत्रित करणारी आहे.मेथीच्या भाजीइतकेच मेथीदाण्यातही भरपूर औषधी तत्व आहेत.बाळंतिणीसाठी खूपच उपकारक आहेत.बहुतेक बाळंतिणींच्या आहारात मेथीची भाजी आणि मेथ्यांचे लाडू याचा समावेश असतोच. आजचे ठेपले मी पारंपारिक गुजराथी पद्धतीने केलेत.कणिक भिजवताना दह्याचा वापर आणि परतलेली मेथी घालून केलेले हे ठेपले नक्कीच आवडतील. दरवर्षी दीड दिवसाच्या गणपतीला माझ्या मामेसासूबाई अतिशय रुचकर असे अनेक पदार्थ बनवतात,त्यात ठेपले/पराठे आवर्जुन करतातच!!त्यांच्या हातची आगळीवेगळी चव मग वर्षभर लक्षात रहाते.मस्त,चटकदार कैरीचे लोणचे,दाण्याची चटणी किंवा कैरीचा छुंदा याच्यासह ठेपले खाणे सगळ्यांच्या आवडीचे.प्रवासातली टिकाऊ शिदोरी म्हणून आवर्जून केला जाणारा हा पदार्थ बघा तर करुन....!! Sushama Y. Kulkarni -
-
नाचणीचे पौष्टिक धपाटे (Nachniche dhapate recipe in marathi)
मी सोनाली सूर्यवंशी यांची ही रेसिपी कूकस्नॅप केली आहे.रेसिपी मध्ये मी थोडा बदल केला आहे. एक कांदा चिरून घातलेला आहे.खूप छान झाले, नाचणीचे पौष्टिक धपाटे. Sujata Gengaje -
मिक्स पकोडा (mix pakoda recipe in marathi)
#GA4 #week3 #pakoda गोल्डन ऍप्रॉन मध्ये " पकोडा " हा कीवर्ड आला आहे. म्हणून मी आज मिक्स पकोडा ही रेसिपी पोस्ट करत आहे. मी आज या मध्ये कांदा, बटाटा, मिरची आणि आळूचे पकोडे केले आहेत. माझी आजची रेसिपी कशी वाटली ते सांगा. नक्की करून पहा. Rupali Atre - deshpande -
मिक्स भाज्यांचे थालीपीठ
बऱ्याच वेळा मुले काही पालेभाज्या व काही फळभाज्या खात नाही, तर त्यांच्या पोटात कसे जातील. यासाठी हे थालीपीठ आहे. पौष्टिक पोटभरीचे असे हे थालीपीठ आहे. सर्वांसाठी नक्कीच ते चांगले आहे. Sujata Gengaje -
पालक पुरी (palak puri recipe in marathi)
पालेभाज्या खायला मुले कंटाळा करतात. त्या मुळे पालकची प्युरी करून पालक पुरी केली तर पालेभाज्यांचा पण दैनंदिन जेवणामध्ये किंवा नाश्त्यामध्ये मी समावेश करते.पालक ही भाजी पौष्टिक असते.प्रथिने,लोह,, विटामिन युक्तअसते. दररोज जेवणामध्ये पालेभाज्यांचा समावेश केल्यास डोळे चांगले राहतात..म्हणून पालक पूरी नाश्त्याला करत आहे. rucha dachewar -
दुधी पराठा (dudhi paratha recipe in marathi)
#cpm2 दुधीभोपळ्याची भाजी...कशीही करा..कितीही तिला मसाल्यांनी नटवा सजवा..तरीही ही भाजी पानात वाढल्यावर कपाळावर आठी येतेच..निराशेचा सूर आळवला जातो..Oh..No ..Not again ..असले इंग्रजाळलेले शब्द कानावर पडतात..मुकाट्याने औषध समजून ही भाजी गिळायचीच आहे..असंही फर्मान निघतं..गरीब बिचारी प्रजा मुकाट्याने खाते..पण घरातलं एखादं वांड वासरु नाही तर नाही तोंड लावत भाजीला..मग घरातली किचन क्वीन गुणकारी दुधीभोपळा खाल्ला जावा म्हणून नाना तर्हेचे उपाय योजते..दुधी हलवा,दुधीची खीर,दुधीभोपळ्याचं रायतं,दुधीचे मुटके,कोफ्ते,तर कधी दुधीभोपळ्याचे पराठे...पण हार मानत नाही ती...अहो शेवटी ती किचनक्वीन ना !!!!..😀😍...तिच्या सुगरणपणा पुढे सगळी जनता नतमस्तकच....आणि मग Three Cheers for Kitchen queen...🤘🤘🤘..अशा जल्लोषात ताटातील पदार्थाचा कधी फडशा पडतो हे कळत देखील नाही...😀😀 चला तर मग या चमचमीत रेसिपीकडे...😋😋 Bhagyashree Lele -
धपाटे (dhapate recipe in marathi)
#Cooksnap#ही रेसिपी मी हेमा वने यांची पाहून थोडा बदल करून बनवली आहे. धपाटे हे थालीपिठाच्या प्रकारात मोडतात. प्रत्येक प्रांतात बनवण्याची थोडी फार वेगळी पद्धत असते. हे हाताने थापटून करतात. थापताना धप धप आवाज होतो त्यावरून धपाटे असे नाव पडले. Shama Mangale -
पंजाबी स्टाइल पराठा(दुधी पराठा) (Dudhi Paratha Recipe In Marathi)
#PBR पंजाबी पदार्थ हे स्वादिष्ट तर असतातच सोबतच पौष्टिक ही असतात.दुधी भोपळ्यात पाण्याचा अंश जास्त असतो त्यामुळेच ही भाजी जास्त प्रमाणात खाल्ली जाते आज आपण पराठा बनवणार आहोत. पंजाबी लोक पराठे मोठ्या प्रमाणात आहारात समावेश करतात. Supriya Devkar -
लापशी (lapsi recipe in marathi)
#KS6 थीम:6 जत्रा स्पेशलरेसिपी क्र. 3 #लापशीजत्रेत जेवण ही असते.त्यात भात, वांगे,बटाटे रस्सा भाजी व लापशी,बुंदी, शिरा हे पदार्थ असतात.मी आज लापशी करून बघितली. गावाकडच्या लग्नात सुद्धा लापशी असते.पौष्टिक असा हा पदार्थ आहे. Sujata Gengaje -
दुधी थेपला (dudhi thepla recipe in marathi)
#GA4 #week12Besan या क्लूनुसार मी रेसिपी पोस्ट केली आहे.दुधीचे थेपल्यामध्ये बेसन आणि दही घातल्यामुळे ते गार झाल्यावर ही मऊ राहतात. Rajashri Deodhar -
लौकी भाजी पराठा विथ दही चटणी (lauki bhaji paratha recipe in marathi)
मुले लौकी ची भाजी खात नाही मुलांना पराठे बनवून दिले तर ते आवडीने खातील HARSHA lAYBER -
पालक धपाटे/पराठे (palak parathe recipe in marathi)
#पालकधपाटेपालेभाज्या खाण्याचा मुले कंटाळा करतात,मग अशा वेळी पालक सारख्या पौष्टीक भाज्या तर खायलाच हव्यात म्हणुन हि खास रेसिपी....पालक धपाटे किंवा पराठे... Supriya Thengadi -
मिक्स veg बाजरा थेपले (mix veg bajra theple recipe in marathi)
#GA4#week20#thepla पझल मधुन थेपला हा की वर्ड घेउन मस्त पौष्टीक असे हे बाजरीचे थेपले केले आहेत.मस्त आवडेल त्या आणि available असतील त्या भाज्या घालुन तुम्ही हे पौष्टीक थेपले करू शकता.मुलांना टिफीनमधे देण्यासाठी हा एक चांगला option आहे. Supriya Thengadi -
पालक कोबी पराठा (palak kobi paratha recipe in marathi)
# पालेभाजी रेसिपी लहान मुले सहसा पालक कोबी खात नाहीत त्यांना आपण असे पराठे बनवून दिले तर नक्की खातील. Najnin Khan -
दही धपाटे (Dahi Dhapate Recipe In Marathi)
#NVR दही धपाटे. मराठवाडा स्पेशल आहे , आता सगळीकडेच मिळु शकते. Shobha Deshmukh -
-
दुधी भोपळ्याचे थालीपीठ (dudhi bhoplyache thalipeeth recipe in marathi)
दुधी भोपळा लहान मुले खात नाही. वडी,भजी अशाप्रकारे आपण पदार्थ करून खाऊ घालणे.आज मी थालीपीठ केले.खूप छान लागतात. Sujata Gengaje -
थालिपीठ (thalipeeth recipe in marathi)
#रेसिपीबुक#week5पावसाळ्यातील पौष्टिक,चटकदार गरम गरम थालिपीठ म्हणजे स्वर्ग सुख. बाहेर धुवाधार पाऊस आणि खायला गरम थालिपीठ आणि त्यावर लोण्याचा गोळा आहा हा. आज मी केलं आहे थालिपीठ. तुम्हाला रेसिपी आवडली तर तुम्ही ही नक्की करून पाहा. प्राची मलठणकर (Prachi Malthankar)
More Recipes
टिप्पण्या (2)