♦️टूटी फ्रुटी केक

P G VrishaLi
P G VrishaLi @Vrishali1958
kolhapur

♦️टूटी फ्रुटी केक

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

एक तास
4 servings
  1. ♦️साहित्य दोन वाट्या गव्हाचं पीठ दीड वाटी साखर पाऊण वाटी बटर, पाऊण वाटी दही अर्धा टीस्पून बेकिंग सोडा दीड टीस्पून बेकिंग पावडर अर्धा चमचा दालचिनी पावडर अर्धा चमचा व्हॅनिला इसेन्स बदा रंगीत टूटी-फ्रुटी आवश्यकतेनुसार दुध एक कप

कुकिंग सूचना

एक तास
  1. 1

    ♦️कृती
    प्रथम एका वाटीत दुधात टूटी फ्रुटी भिजवून ठेवले.
    एका बाऊलमध्ये दही, बटर, बारीक करून घेतलेली साखर एकत्र करून घेतली
    त्यामध्ये व्हॅनिला इसेन्स घालून एकजीव करुन घेतले

    ♦️नंतर दुसऱ्या भांड्यात गव्हाचं पीठ, बेकिंग सोडा, बेकिंग पावडर, दालचिनी पावडर, एकत्र करून घेतले
    हे मिश्रण साखरेच्या मिश्रणात थोडं-थोडं घालून भिजवलेले ड्राय फ्रुट तयार पिठात मिसळून घेतले

    ♦️केकच्या भांड्याला बटर लावून घेतले व वरती थोडा मैदा भुरभुरला त्यात तयार मिश्रण ओतले
    त्यावर परत थोडी टूटी-फ्रुटी टाकली.

    ♦️ गरम केलेल्या प्रेशर कुकरमध्ये मीठ घालून त्यावर स्टँड ठेवला
    हे भांडे त्या स्टँडवर ठेवले.

  2. 2

    ♦️त्यानंतर कुकरची शिट्टी आणि रिंग काढून टाकून हा केक पस्तीस ते चाळीस मिनिटांपर्यंत मंद आचेवर भाजून घेतला

    ♦️असेच थोडे मिश्रण केक साच्यात घालून ते केक साचे एका ताटलीत ठेवून भाजुन घेतले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
P G VrishaLi
P G VrishaLi @Vrishali1958
रोजी
kolhapur
interested in cooking
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes