एगलेस केक (without oven) #nutan

Shilpa Aher
Shilpa Aher @cook_19763567
Akola

ओव्हन नसतानाही कुकर मध्ये फक्त घरातलेच सामान वापरुन तयार होणारा सोपा आणि चविष्ट केक. ख्रिसमस जवळ आला आहे तेव्हा सर्वांनी हा केक करून पहा आणि आस्वाद घ्या.

एगलेस केक (without oven) #nutan

ओव्हन नसतानाही कुकर मध्ये फक्त घरातलेच सामान वापरुन तयार होणारा सोपा आणि चविष्ट केक. ख्रिसमस जवळ आला आहे तेव्हा सर्वांनी हा केक करून पहा आणि आस्वाद घ्या.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

  1. मैदा - 2 वाटी
  2. साखर - 1 वाटी
  3. तूप - पाऊण वाटी
  4. दुध - दीड वाटी
  5. 2 चमचेबेकिंग पावडर
  6. 1 चमचासोडा
  7. चिमूटभरमीठ
  8. इसेन्स - वॅनिला अर्धाचमचा
  9. (टीप - केकसाठी वाटी आणि चमचा हे प्रमाण वापरले आहे.)
  10. सजावटीसाठी चेरी आणि ड्रायफ्रुट

कुकिंग सूचना

  1. 1

    प्रथम दोन वाट्या मैदा घेऊन त्यात बेकिंग पावडर, सोडा आणि मीठ टाकून चाळून घेणे. नंतर दुधामध्ये साखर विरघळून घेणे. व त्यात गरम तूप टाकणे. (तूप गरम करताना ते केक करायच्या भांड्यातच गरम करणे व त्यावर मैदा भुरभुरने म्हणजे केक पॅन तयार झाला

  2. 2

    वरील दुधाच्या मिश्रणात चाळलेला मैदा टाकणे,व चांगले फेटून घेणे. तसेच गॅसवर कुकर, केक पॅन कमी फ्लेमवर तापायला ठेवणे. फेटलेल्या मिश्रणात वॅनिला इसेन्स, चेरी आणि ड्रायफ्रुट्स टाकणे.मिश्रण केक पॅन मध्ये ओतणे. कुकरचे झाकण लावताना त्याची रिंग व शिटी काढणे. 35/40 मिनिटात केक बेक झाल्याचा सुगंध येतो. तेव्हा झाकण उघडून केकमध्ये सूरी घालून तपासून पाहावे, सूरी स्वच्छ निघाल्यास केक झाला असे समजून गॅस बंद करावा. 10मिनिटांनी केकपॅन बाहेर काढून हलक्या हाताने ट्रेमध्ये केकपॅन उलटा करणे अलगद केक छान निघतो.

  3. 3

    👌👌🎂 cake ready

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Shilpa Aher
Shilpa Aher @cook_19763567
रोजी
Akola

टिप्पण्या

Similar Recipes