मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस)

Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733

#Goldenapron3 #week4 #स्प्राऊट्स
मोड आलेल्या कडधान्यांचे सगळेच पदार्थ इथे बनले होते पण काय करायचे हे काही सुचत नव्हता मग काहीतरी चाट करायचा म्हणून मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस ) करायचे ठरवले

मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस)

#Goldenapron3 #week4 #स्प्राऊट्स
मोड आलेल्या कडधान्यांचे सगळेच पदार्थ इथे बनले होते पण काय करायचे हे काही सुचत नव्हता मग काहीतरी चाट करायचा म्हणून मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचे (रगडा - पॅटीस ) करायचे ठरवले

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

४० मिनिटे
४ जणांना साठी
  1. १ वाटी मोड आलेली मिक्स कडधान्य
  2. कांदा
  3. टोमॅटो
  4. उकडलेले बटाटे
  5. सालीचे ब्रेड
  6. चमचे आलं-लसूण-मिरची पेस्ट
  7. अर्धी वाटी खजूर चटणी
  8. लाल मिरची पावडर
  9. १ चमचा हळद
  10. बारीक पिवळी शेव
  11. कोथिंबीर
  12. तेल
  13. चवीनुसार मीठ

कुकिंग सूचना

४० मिनिटे
  1. 1

    लागणारे साहित्य

  2. 2

    मोड आलेल्या मिक्स कडधान्य, हळद आणि चवीनुसार मीठ घालून शिजवून घ्यावे.

  3. 3

    कढईत तेल टाकून त्यावर बारीक चिरलेला कांदा टाकून परतवून घ्यावे त्यात बारीक चिरलेला टोमॅटो छान शिजवून त्यात आलं-लसूण-मिरची पेस्ट घालावी हे सर्व छान परतवून त्यात शिजवलेले मिक्स कडधान्य घालून एक उकळी काढावी.

  4. 4

    पॅटिस साठी उकडलेले बटाटे, हळद, आलं-लसूण-मिरची पेस्ट, ब्रेड स्लाइस थोडेसे ओले करून, १ चमचा मीठ, थोडी कोथिंबीर हे सर्व एकत्र करावे.

  5. 5

    सर्व मिश्रणाला आवडीप्रमाणे आकार देऊन, पॅन मध्ये शॅलो फ्राय करावे.

  6. 6

    सर्व प्रथम पॅटिस एका खोलगट भांड्यात ठेवावे, नंतर त्यावर मोड आलेल्या मिक्स कडधान्यांचा रगडा घालावा, त्यावर खजूर चटणी, बारीक चिरलेला कांदा - कोथिंबीर, बारीक शेव घालून सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dhanashree Suki
Dhanashree Suki @cook_20554733
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes