खतखतं (khatkaht recipe in marathi)

Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
Satara

#Shravanqueen
Recipe 4
खतखतं ही पारंपारिक सारस्वत रेसिपी आहे गोवा आणि कोकणात वेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते अतिशय पौष्टिक आणि एक वनमील म्हणून खूप छान डिश आहे

खतखतं (khatkaht recipe in marathi)

#Shravanqueen
Recipe 4
खतखतं ही पारंपारिक सारस्वत रेसिपी आहे गोवा आणि कोकणात वेगळ्या पद्धतीने ही भाजी केली जाते अतिशय पौष्टिक आणि एक वनमील म्हणून खूप छान डिश आहे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

25मि.
5 जणांसाठी
  1. 1/२ वाटी लाल भोपळ्याचा फोडी
  2. थोडा दुधी भोपळा
  3. 1/2 इंचदोडक्याचा तुकडा
  4. 1/२ इंच गिलक्याचा तुकडा
  5. 1 टेबल स्पूनफ्लावरचे तुरे
  6. 2फरसबी चिरलेली
  7. 3वालपापडी चिरलेल्या
  8. 3चपटे वाल चिरलेले
  9. 2तोंडली चिरलेली
  10. 2गवारीच्या शेंगा तोडलेल्या
  11. 3चवळीच्या शेंगा तोडलेल्या
  12. २कणीस ८/१० तुकडे केलेले
  13. 1 टेबलस्पूनशेंगदाणे कच्चे
  14. 1/2गाजर
  15. 1बटाटा
  16. 4/5फ्लॉवरचे छोटे तुकडे
  17. ४/५करवंद
  18. 1अर्धवट कच्चा टोमॅटो
  19. 1/2लाल खड्या मिरच्या( हे ऑप्शनल आहे
  20. ४/५ कढिपत्ता पान( हे पण ऑप्शनल आहे
  21. 2 टेबलस्पूनतेल
  22. 1/2 टेबलस्पूनलाल तिखट
  23. 1 टीस्पूनहळद
  24. 1/2 टीस्पूनहिंग
  25. 1/2 टीस्पूनमोहरी
  26. 1/2 वाटीनारळाचा चव
  27. 1 टेबलस्पूनचिंचेचाा कोळ
  28. ८/१० काळी मिरी
  29. चवीनुसारमीठ

कुकिंग सूचना

25मि.
  1. 1

    सर्वप्रथम कणसाचे तुकडे करून घ्या त्याचे तुकडे आणि शेंगदाणे हे एकत्र कुकरमध्ये दोन शिट्ट्या काढून घ्या

  2. 2

    ओलं नारळ मिरी चिंचेचा कोळ मिक्सरमध्ये वाटून पेस्ट करा गाजर चिरा फ्लावरचे तुरे कापा बटाटा चिरून घ्या करवंद चिरून घ्या

  3. 3

    दुधी भोपळा दोडका गिलके तोंडले चिरून फोडी करा सर्व शेंगांच्या शिरा काढून त्यांना तुम्हाला पाहिजे त्या मोठ्या किंवा लहान तुकड्यात शेंगा तोडून घ्या साधवरण मीठ घालून थोडे पाणी घालून पातळसर करून घ्या

  4. 4

    एका पॅनमध्ये तेल टाकून त्यात मोहोरी हिंग हळद झाला त्यानंतर त्यात प्रथम चिरलेल्या बटाट्याचा फोडी घाला त्यानंतर गाजर फ्लॉवर ज्या भाज्या शिजायला वेळ लागतो त्या आधी घालायचा त्यानंतर लाल भोपळा दुधी भोपळा सर्व शेंगा शिजवलेले कणीस टोमॅटो एकेक भाज्या घालून सर्व शिजवून घ्यायच्या मीठ टाकायचं छान वाफ आल्यावर की त्यात शिजलेला वरण टाकायचं थोडं पाणी टाकायचं दोन मिनिटे शिजू द्यायचं त्यानंतर वाटलेला नारळाची पेस्ट टाकायची एक मिनिट शिजू द्यायचं नारळ टाकल्यावर भाजी जास्त शिजवू नये आणि गॅस बंद करायचा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Deepali dake Kulkarni
Deepali dake Kulkarni @deepali_kulkarni
रोजी
Satara
Hay I am Deepali Dake Kulkarni by profession I am cosmetologist but cooking is my passion I love cooking I do cooking demo with Maharashrtha time also participated in all Marathi TV Chalel I also participated master chef season 1st
पुढे वाचा

Top Search in

टिप्पण्या (14)

Bhagyashree Lele
Bhagyashree Lele @Bhagyashree_19636528
Amazing taste👌👌👍...इतकी चविष्ट रेसिपी शेअर केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद 😊🌹

Similar Recipes