हळीव पौष्टीक लाडू (haliv ladoo recipe in marathi)

Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351

#लाडू
ही माझ्या आईची रेसिपी आहे. हे लाडू खूप पौष्टिक तर आहेच पण हे त्वचेसाठी व केसांसाठीही खूप उपयुक्त आहेत.
हे लाडू पावसाळ्यामध्ये किंवा थंडी मध्येच करावेत कारण हे उष्ण असल्यामुळे हे लाडू उन्हाळ्यामध्ये नाही करत.
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा 🙂

हळीव पौष्टीक लाडू (haliv ladoo recipe in marathi)

#लाडू
ही माझ्या आईची रेसिपी आहे. हे लाडू खूप पौष्टिक तर आहेच पण हे त्वचेसाठी व केसांसाठीही खूप उपयुक्त आहेत.
हे लाडू पावसाळ्यामध्ये किंवा थंडी मध्येच करावेत कारण हे उष्ण असल्यामुळे हे लाडू उन्हाळ्यामध्ये नाही करत.
ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली नक्की मला सांगा 🙂

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

१५ मिनिटे
  1. २० ग्रामहळीव
  2. 1/2ओला नारळ
  3. 1 वाटीसाखर
  4. 1 टी स्पूनतूप

कुकिंग सूचना

१५ मिनिटे
  1. 1

    प्रथम हळीव निवडून घ्यावेत व ते पाण्यामध्ये भिजत घालावेत हळीव डूबे पर्यंतचा पाणी घालायचे आहे जास्त पाणी ऍड करायचे नाहीये व ते आता अर्धा तासापर्यंत साईडला ठेवायचे आहे.

  2. 2

    ओला अर्धा नारळ घेऊन तो खाऊन घ्यायचा आहे किंवा तुम्ही तो मिक्सर मध्ये फिरवला तरी चालेल.आता त्यामध्ये एक वाटी साखर मिक्स करायचे आहे. आता ओला खोबऱ्याचे मिश्रण व साखर एकत्र करून तेही अर्ध्या तासापर्यंत साईडला ठेवायचे आहे.

  3. 3

    आता अर्ध्या तासानंतर हे हळीव छान फुलून येतात व खोबरा व साखर यांचे मिश्रण छान एकजीव होऊन त्याला थोडेसे पाणी सुटते. आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकत्र करायचे आहे

  4. 4

    आता एक पॅन गॅसवर ठेवावा व त्यामध्ये वन टी स्पून तूप घालावे. तू थोडेसे गरम झाल्यावर आता आपण मिक्स केलेले हळीव ओले खोबरे आणि साखरेचे मिश्रण पॅनमध्ये घालावे. एक सारखे मंद आचेवर परतून घ्यावे

  5. 5

    आता या मिश्रणाला हळूहळू पाणी सुटू लागते त्यामुळे हे सतत आपल्याला मंद आचेवर परतून घ्यायचे आहे जोपर्यंत त्याचा गोळा व्हायला सुरुवात नाही होत तोपर्यंत.हे मिश्रण छान एकजीव झाल्यावर ते गोळा होण्यास सुरुवात होते म्हणजेच समजावे की आपले मिश्रण तयार झाले आहे.

  6. 6

    आता हे मिश्रण थोडेसे कोमट झाल्यावर लगेच लाडू वळून घेणे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Dipali Kathare
Dipali Kathare @cook_24949351
रोजी

Similar Recipes