दाल तडका (daal tadka recipe in marathi)

Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
Vashi

#लंच
साप्ताहिक रेसिपी

दाल तडका (daal tadka recipe in marathi)

#लंच
साप्ताहिक रेसिपी

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मिनिट
2व्यक्ती साठी
  1. 1 कपतुर डाळ
  2. 1कांदा
  3. 1टोमॅटो
  4. 2-3लाल सुक्या मिरच्या
  5. 6-7लसूण पाकळ्या
  6. 1/2 इंचआले
  7. 1 टेबलस्पूनलाल तिखट
  8. 1 टेबलस्पूनधने पावडर
  9. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  10. 1/2 टेबलस्पूनहळद
  11. 1 टेबलस्पूनजीरे
  12. 2 टेबलस्पूनतुप
  13. 1/2 टेबलस्पूनहिंग
  14. 1 टेबलस्पूनमीठ
  15. अवशक्ततेनुसार पाणी

कुकिंग सूचना

30 मिनिट
  1. 1

    तुरीची डाळ स्वच्छ धुवून कुकर मधून तीन शिट्या देऊन शिजवून घ्यावी.

  2. 2

    कांदा, टोमॅटो, लसूण, आले, कोथिंबीर चिरून घ्यावे.

  3. 3

    गॅसवर पॅन मध्ये एक चमचा तुप घ्यावे. तापल्यावर त्यात जीरे घालावे. जीरे लाल झाल्यावर त्यात लसूण, आल्याचे तुकडे व कांदा घालून परतून घ्यावा. त्यात टोमॅटो घालावे. ते मऊ होईपर्यंत परतावे.सुक्या मिरच्या, हिरवी मिरची घालावी.

  4. 4

    त्यात सर्व मसाले घालून शिजवलेली डाळ घालावी. मीठ घालून सर्व चांगले ढवळून घ्यावे. पाच मिनिटे उकळी काढावी.फोडणी पात्रात तुप घेऊन त्यात(फोडणी)तडका करून तयार झालेल्या डाळीवर ओतावा.दाल तडका तयार वरून कोथिंबीर घालून भात किंवा रोटी बरोबर सर्व्ह करावे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shama Mangale
Shama Mangale @cook_26566429
रोजी
Vashi
मला पदार्थ बनवायला आणि खिलवायला आवडते.
पुढे वाचा

Similar Recipes