लेकुरवाळी भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
नवी मुंबई

लेकुरवाळी भोगीची भाजी
भोगीच्या दिवशी लेकुरवाळी भाजी बनवतात.
यावेळेस मटार, गाजर, वांगी, तीळ असे पीक विपुल प्रमाणात तयार होते त्यामुळे या काळामध्ये मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचा कूट घालून भाजी तयार करतात त्याच्या सोबतीला तीळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच मुगाच्या डाळीची खिचडी ही या दिवशी केली जाते 😊

लेकुरवाळी भोगीची भाजी (bhogichi bhaji recipe in marathi)

लेकुरवाळी भोगीची भाजी
भोगीच्या दिवशी लेकुरवाळी भाजी बनवतात.
यावेळेस मटार, गाजर, वांगी, तीळ असे पीक विपुल प्रमाणात तयार होते त्यामुळे या काळामध्ये मिळणाऱ्या सर्व भाज्या एकत्र करून त्यात तिळाचा कूट घालून भाजी तयार करतात त्याच्या सोबतीला तीळ लावलेली बाजरीची भाकरी तसेच मुगाच्या डाळीची खिचडी ही या दिवशी केली जाते 😊

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

30 मि
4 सर्व्हिंग्ज
  1. 3मोठे चमचे तेल
  2. 1मोठा कांदा बारीक चिरलेला
  3. 1 छोटाटोमॅटो
  4. 1छोटी वाटी पावटा
  5. 1छोटी वाटी हरबरा
  6. 1छोटी वाटी घेवडा
  7. 1वांग
  8. 1छोटी वाटी गाजर
  9. 1छोटी वाटी वाटाणा
  10. 1छोटी वाटी शेंगदाणे
  11. चवीनुसारमीठ
  12. 2छोटे चमचे तीळ
  13. 4छोटे चमचे काळा मसाला
  14. 2 चिमूटहिंग
  15. 2 ग्लासपाणी
  16. 1/2शेंगदाण्याचा कूट
  17. 1/2तिळाचा कूट
  18. 3-4बोरांचा गर
  19. छोटातुकडा गुळ
  20. जिरं
  21. कोथिंबीर
  22. कांदा खोबरे थोडेसेच लालसर भाजून घ्यावे आणि लसुन आले,कोथिंबीर घेऊन त्यांचे मिक्सरवर बारीक वाटण तयार करून घ्यावे

कुकिंग सूचना

30 मि
  1. 1

    एका जागी सर्व साहित्य जमा करणे भाज्या स्वच्छ धुऊन निवडून घ्याव्यात. एका कडे मध्ये तीन चमचे तेल गरम करून त्यामध्ये तीळ, जीरे आणि हिंग तडतडले की त्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालावा

  2. 2

    कांदामध्ये नंतर टोमॅटो घालून दोन्ही एकजीव होईपर्यंत छान पैकी परतावे. त्यामध्ये काळा मसाल घालून एकजीव करून घेणे तसेच तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. त्यामध्ये मसाले चांगले परतले की त्यामध्ये वाटण घालून चांगले तेल सुटेपर्यंत परतून घ्यावे. मसाल्या मध्येच बोराचा गर, गुळ आणि तीळ शेंगदाणेयाचा कूट घालाव.

  3. 3

    मसाले चांगले परतले कि सर्व भाज्या मसाल्यात घालून ते व्यवस्थित मसाला भाज्यांना लागेपर्यंत परतून घ्यावे त्यावर
    तीन-चार मिनिटे झाकण ठेवून ते परतून घ्यावे.

  4. 4

    त्यामध्ये दीड ते दोन ग्लास गरम पाणी घालावे व चवीनुसार मीठ घालावे व भाजी सात ते आठ मिनिटे मध्यम आचेवर शिजवावे. त्यामध्ये आपली लेकुरवाळी भोगीची भाजी तयार आहे त्यावर थोडीशी कोथिंबीर पेरावी लेकुरवाळी भोगीची भाजी तयार आहे. तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीबरोबर मूग डाळ खिचडी, लिंबाचे लोणचे, लिंबाची फोड आणि मीठा बरोबर खावे. बाजरीच्या भाकरी वर थोडे लोणी घेऊन खावे त्यामुळे खुपच छान टेस्ट सर्व जेवणाला येते

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स (9)

Cook Today
Vandana Shelar
Vandana Shelar @cook_26261725
रोजी
नवी मुंबई
Youtuber- Vandana's RecipeHome made RecipesFood Blogger
पुढे वाचा

टिप्पण्या (2)

Sumedha Joshi
Sumedha Joshi @sumedha1234
तुमची भोगी ची भाजी बनवली खुपचं छान झाली. धन्यवाद.

Similar Recipes