बटर पॉपकॉन. (butter popcorn recipe in marathi)

Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg

#GA4
#week20
#पाॅपकाॅन
लहान मुलांच्या आवडीचे, सोबतच मोठ्यांच्या देखील...
मार्केटसारखे पॉप कॉन घरच्या घरी बनवून, आपल्या आवडीनुसार मसाले घालून पॉपकॉन तयार करू शकतो... जसे की मीठ आणि मिरे पावडर वापरून पेपर पॉपकॉन, मसाला पॉप कॉन बनवून आस्वाद घेऊ शकतो..
चला तर मग करूया *बटर पॉपकॉन*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

5 मिनिटे
चार व्यक्ती साठी
  1. 1/2 कपमका
  2. 4-5 टेबलस्पूनतेल
  3. चवीनुसारमीठ
  4. 3-4 टेबलस्पूनबटर
  5. 1/2 टेबलस्पूनहळद

कुकिंग सूचना

5 मिनिटे
  1. 1

    पॉपकॉन करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य काढून तयार ठेवावे.

  2. 2

    जाड बुडाच्या भांड्यामध्ये किंवा कुकरमध्ये तेल घालावे. तेल किंचित गरम झाले की त्यामध्ये मका घालावे. मक्याला एक ते दोन मिनिटं परतून घेतल्यानंतर त्यात मीठ व हळद घालावी. एक मिनिट होऊ द्यावे.

  3. 3

    एक-दोन मक्याच्या लाह्या फुटायला सुरुवात झाली की, त्यामध्ये बटर घालावे. मिक्स करावे व झाकण ठेवून हाय फ्लेम वरती पूर्ण मका फुटण्याचा आवाज येईस्तोवर होऊ द्यावे. (मध्ये मध्ये भांड्याला कपड्याने पकडून किंचित हलवत राहावे. म्हणजे पाॅपकाॅन चांगले फुटतात.)

  4. 4

    तयार आहे आपले चटपटीत *बटर पॉपकॉन*... 💃 💕

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Vasudha Gudhe
Vasudha Gudhe @vasudha_sg
रोजी

टिप्पण्या

Similar Recipes