इन्स्टंट अनारसे (instant anarsa recipe in marathi)

Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
नाशिक

#tri
#श्रावणशेफचॅलेंज_week1
अनारसे आपण जेव्हा करतो तेव्हा तीन दिवस तांदूळ भिजत घालुन मग त्याला वाटून त्याची पीठ तयार करून अनारसे करतो .पण मी आज एकदम सोप्या पद्धतीने झटपट अनारसे कसे करायचे याची रेसिपी शेअर करत आहे .एकदा नक्की ट्राय करा

इन्स्टंट अनारसे (instant anarsa recipe in marathi)

#tri
#श्रावणशेफचॅलेंज_week1
अनारसे आपण जेव्हा करतो तेव्हा तीन दिवस तांदूळ भिजत घालुन मग त्याला वाटून त्याची पीठ तयार करून अनारसे करतो .पण मी आज एकदम सोप्या पद्धतीने झटपट अनारसे कसे करायचे याची रेसिपी शेअर करत आहे .एकदा नक्की ट्राय करा

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

45 मिनीट
14 ते 15 अनारसे
  1. 125 ग्रामतांदूळ पीठ
  2. 125 ग्राममैंदा
  3. 250 ग्रामसाखर
  4. 300मिली पाणी(पाका साठी)
  5. तेल तळण्यासाठी

कुकिंग सूचना

45 मिनीट
  1. 1

    साखर व पाणी एकत्र करून साखर वितळेपर्यंत उकलून साखरेचा पाणी तयार करून थंड करून घ्या(पाक नाही करायचा)

  2. 2

    एका बाऊलमध्ये तांदळाचे पीठ व मैदा एकत्र करून त्यात थोड थोड तयार साखरेचे पाणी घालून पातळ मिश्रण तयार कराव व कमीत कमी 30 मिनिटे झाकून ठेवावा

  3. 3

    30 मिनिटानंतर तयार मिश्रणाला चार ते पाच मिनिटे चांगले फेटून घ्यावं. एका खोलगट तवा किंवा कढईमध्ये तीन ते चार टेबलस्पून तेल किंवा तूप गरम करून घ्यावे व त्यात एक चमचा तयार मिश्रण घालावे

  4. 4

    तयार अनरसा न उलता तसं आपण त्याच्यावर चारी बाजूंनी चमचे ने वरुन तेल घालून तळून घ्यावे.खरपूस तळून झाल्यावर तव्यावर कड़े ला ठेवून जास्तीचं तेल नितरुन घ्यावे

  5. 5

    इन्स्टंट अनारसे थंड करून डब्यात भरून ठेवावे

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Bharti R Sonawane
Bharti R Sonawane @Bhartisonawane
रोजी
नाशिक
स्वपाक ही एक कला आहे व स्वंयपाक घर एक प्रयोगशाला
पुढे वाचा

Similar Recipes