बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)

Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies

#nrr
उपवासासाठी बटाट्याचा फराळी चिवडा रेसिपी पुढीलप्रमाणे...

बटाट्याचा फराळी चिवडा (batatyache farali chivda recipe in marathi)

#nrr
उपवासासाठी बटाट्याचा फराळी चिवडा रेसिपी पुढीलप्रमाणे...

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

20 मिनिटे
  1. 200 ग्रॅमबटाटा किस (वाळलेला, तळण्यासाठीचा)
  2. 1 वाटीशेंगदाणे
  3. 10-12काजू पाकळ्या
  4. 3 टेबलस्पूनपिठीसाखर
  5. 2 टेबलस्पूनतिखट
  6. 1 टेबलस्पूनजीरे पावडर
  7. मीठ चवीनुसार
  8. तळणीसाठी आवश्यकतेनुसार तूप किंवा तेल

कुकिंग सूचना

20 मिनिटे
  1. 1

    उन्हाळी वाळवण-
    बटाट्याचा किस करण्यासाठी बटाटे उकडून फ्रीजमध्ये ठेवावे. सकाळी लवकर सालं काढून जाड्या किसणीने किसून कीस उन्हात वाळवत घालावा. म्हणजे दिवसभराचे भरपूर ऊन मिळते. 5-6 दिवस हा कीस कडक उन्हात वाळवावा. वर्षभर टिकतो.

  2. 2

    तेल छान तापल्यावर त्यात बटाट्याचा किस थोडाथोडा टाकून तळुन घ्यावा. तेल चांगले तापलेले असावे व नंतर मंद आचेवर किस तळावा. तेल चांगले तापलेले असल्यावर बटाट्याचा किस लगेच वर येतो. एका मोठ्या बाउल मध्ये काढुन घेणे.

  3. 3

    नंतर याच गरम तेलात शेंगदाणे, काजु तळुन प्लेटमध्ये काढा. आवडत असल्यास मनुकाही घालू शकता.
    बाउल मधल्या तळलेल्या बटाट्याच्या किसामध्ये तळून घेतलेले शेंगदाणे, काजू घालून मिक्स करून घ्यावे. त्यात पीठी साखर, तिखट, जीरे पावडर, मीठ घालून छान मिक्स करावे.

  4. 4

    बटाट्याचा फराळी चिवडा तयार.

  5. 5
रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Shital Muranjan
Shital Muranjan @shitals_delicacies
रोजी
Follow to learn Awesome Delicacies to bring sweetness to your life n your loved ones|Homebaker|Author|foodblogger|Creative||vegetarian| |Food Photography | |Love for Cooking baking|
पुढे वाचा

टिप्पण्या

Similar Recipes