फराळी भेळ (farali bhel recipe in marathi)

Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar

#fr #फराळी_भेळ
ओम् नमः शिवाय 🙏
प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्दशीला "शिवरात्री" असे संबोधले जाते. पण माघ महिन्यातील वद्य चतुर्दशीला "महाशिवरात्री" असे म्हटले जाते. महाशिवरात्री हा दिवस भगवान शंकरांच्या पूजेचा दिवस असतो. त्यदिवसाची एक आख्यायिका आहे ती अशी की याचदिवशी नकळतपणे एका व्याधाचा म्हणजेच शिकार्याचा उद्धार झाला होता अशी कथा लिंग पुराणात सांगितली जाते ती अशी.. एकदा एक शिकारी जंगलात शिकारीला गेला होता. शिकारीची वाट बघत रात्र होते म्हणून तो नदीच्या काठावरील एका बेलपत्राच्या झाडावर चढून बसतो रात्रीच्या अंधारात फांदीवरील बेलाची पाने तोडून नकळतपणे शिवपिंडीवर टाकत होता‌ आणि तो "ओम" म्हणत होता. त्याचवेळी तिथे एक गर्भिणी हरीण पाणी पिण्यासाठी नदीच्या काठावर येते. आणि शिकारी तिला मारण्यासाठी बाण उगारणार एवढ्यात हरिणीचे लक्ष शिकार्याकडे जाते. ती गाभण असल्याने शिकार्याला विनंती करते की माझ्या प्रसुतीनंतर तू माझे प्राण घेतलेस तरी चालेल. हे बोल ऐकून शिकार्याला उपरती होते आणि ओम नमः शिवाय म्हणत तो झाडावरुन उतरुन हरिणीची माफी मागतो. हे सगळं बघून शंकर भगवान प्रकट होतात आणि व्याध म्हणजेच शिकारी भगवान चरणी नतमस्तक होऊन क्षमा मागतो आणि यापुढे कोणाचीही शिकार या हातून होणार नाही अशी शपथ घेतो. भगवान प्रसन्न होऊन व्याधाला तारामंडळात स्थान देतात‌ तो दिवस असतो महाशिवरात्रीचा 🙏
म्हणूनच या दिवशी बरेच जणं उपवास करुन फक्त फलाहार फराळ करतात, तर काही जणं मांसाहार न करता शिवराक जेवण ग्रहण करतात. यात कांदा आणि लसूण प्रामुख्याने वर्ज्य असतात.
आमचे कुलदैवत श्री मंगेश देव असल्याने आमच्या कडे पण आम्ही सगळे उपवास करतो. यादिवशी मी उपासाची "फराळी भेळ" बनवली होती ती रेसिपी देत आहे.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

३० मिनिटे
४ जणांसाठी
  1. ५०० ग्रॅम साबुदाणा
  2. 3बटाटे उकडलेले
  3. 2रताळी उकडलेली
  4. १०० ग्रॅम भिजत घालून उकडलेले शेंगदाणे
  5. २५० ग्रॅम शेंगदाणे कुट
  6. १५० ग्रॅम बटाट्याचा तळलेला किस किंवा चिवडा
  7. १५० ग्रॅम बटाटा वेफर्स
  8. १०० ग्रॅम ओलं खोबरं
  9. 2 टेबलस्पूनतुप
  10. 8हिरव्या मिरच्या
  11. 2 टीस्पूनजीरे
  12. 2 टीस्पूनमीठ
  13. 2 टीस्पूनपिठीसाखर
  14. १५० ग्रॅम घट्ट दही
  15. 1 लहानकच्ची कैरी

कुकिंग सूचना

३० मिनिटे
  1. 1

    अगदी बारीक असा मिनी साबुदाणा २ तास भिजवून घेतला. मोठा साबुदाणा असेल तर ५ ते ६ तास भिजवून ठेवायचा. थोडे भिजवलेले शेंगदाणे उकडून घेतले. आणि थोडे शेंगदाणे भाजून त्याचे कुट करुन घेतले.

  2. 2

    शेंगदाणे कुट झाल्यावर रताळी आणि बटाटे सोलून उकडून घेतले.

  3. 3

    फोडणीपात्रात तुप घालून त्यात जीरे आणि मिरच्यांचे तुकडे घालून फोडणी बनवली.

  4. 4

    मायक्रोवेव्हच्या वाटी मधे भिजवलेला साबुदाणा, शेंगदाणे कुट, मीठ, पिठीसाखर घालून मिक्स करुन एक मिनिट हाय पाॅवर वर ठेवले मग त्यात तुपाची फोडणी घालून मिक्स केली.

  5. 5

    परत एकदा २ मिनिटे हायपाॅवर वर ठेवून मधे मधे ढवळून खिचडी शिजवून घेतली.

  6. 6

    मग मिक्सरच्या भांड्यात ओलं खोबरं, मिरच्या, शेंगदाणे कुट, जीरे, दही आणि मीठ घालून चटणी बनवली.

  7. 7

    "फराळी भेळ" बनवण्यासाठी एका प्लेटमधे तयार साबुदाणा खिचडी घालून त्यात उकडलेल्या बटाट्याचे आणि रताळ्याचे तुकडे घालून त्यावर उकडलेले शेंगदाणे, बटाटा वेफर्स, बटाट्याचा चिवडा, दही, खोबर्याची चटणी, कैरीचे तुकडे घालून मिक्स करुन लिंबू पिळले.

  8. 8

    एका सर्व्हिंग डिश मधे एका वाटी मधे फराळी भेळ ठेवून त्याच्या बाजूला वाटी मधे साबुदाणा खिचडी, उकडलेल्या बटाट्याचे आणि रताळ्याचे तुकडे, बटाटा वेफर्स, बटाट्याचा चिवडा, उकडलेले शेंगदाणे, कैरी आणि लिंबू ठेवले. आणि बाजूला एका प्लेटमधे फ्रृट्स‌‌ ठेवले.

  9. 9

    "फराळी भेळ" सोबत फ्रृटप्लेट, खोबर्याची चटणी आणि थंडगार ताक सर्व्ह केले.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर

कूकस्नप्स

ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!

Grey hand-drawn cartoon of a camera and a frying pan with stars rising from the pan
Cook Today
Ujwala Rangnekar
Ujwala Rangnekar @Ujwala_rangnekar
रोजी

Similar Recipes