बटाट्याची कोरडी भाजी (batatyachi kordi bhaji reciep in marathi)

Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
Nagpur

#pr .. प्रवासात जातांना मुलांना ही बटाट्याची भाजी करून देत असते मी. झटपट होणारी आणि छान चटपटीत, अशी ही भाजी ...उपवासासाठी जरी करायचे असेल तरी त्यात मोहरी आणि हळद न टाकता सुद्धा ही भाजी आपण उपवासाला करून खाऊ शकतो. त्यात मॅगी मसाला टाकला तर आणखी छान च येते.

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
शेअर

घटक

10-12 मिनिट
1 सर्विंग
  1. 2बटाटे
  2. 1 टेबलस्पूनतेल
  3. 1 टीस्पूनजीरे मोहरी
  4. कढीपत्ता
  5. 1/2 टीस्पूनहळद
  6. 1 टीस्पूनतिखट
  7. 1/2 टीस्पूनधणे पूड
  8. चवीनुसारमीठ
  9. 2 टेबलस्पूनशेंगदाणा कूट
  10. 1/2 टीस्पूनसाखर
  11. कोथिंबीर
  12. लिंबू

कुकिंग सूचना

10-12 मिनिट
  1. 1

    सुरुवातीला बटाटे स्वच्छ धुवून सोलून घ्यावेत. आणि त्याच्या पातळ फोडी करून घ्याव्यात. आणि पाण्यात टाकाव्यात फोडी, म्हणजे त्यातील स्टार्च निघून जातो.

  2. 2

    आता गॅसवर एका पॅन मध्ये तेल टाकावे. तेल गरम झाल्यावर त्यात जीरे मोहरी टाकावी.कढीपत्ता टाकावा.चांगले तडतडले की त्यात हळद तिखट आणि धने पूड टाकावी. मिक्स करून लगेच त्यात बटाट्याच्या फोडी पाण्यातून काढून टाकावे.

  3. 3

    आता त्या बटाट्याच्या फोडी चांगल्या मिक्स करून घ्याव्यात. चवी नुसार मीठ टाकावे.आणि झाकण ठेवून तीन ते चार मिनिटे वाफ काढावी.

  4. 4

    झाकण उघडल्यावर बटाटे शिजलेले दिसतील. आता त्यात शेंगदाण्याचा कूट आणि साखर टाकावी, लिंबू पिळावे आणि पुन्हा एकदा चांगले मिक्स करून दोन मिनिटे झाकण ठेवून शिजू द्यावे.

  5. 5

    आता झाकण काढले की भाजी तयार आहे.वरून कोथिंबीर टाकावी. आणि गरमागरम भाजी, गरमागरम पोळी सोबत सर्व्ह करावे. ही भाजी मी नेहमी मुलांना प्रवासामध्ये टिफिन मध्ये देत असते. त्यांना खूपच आवडते छान चमचमीत चटपटीत लागते ही भाजी..

रेसिपी संपादित करा
See report
शेअर
Cook Today
Varsha Ingole Bele
Varsha Ingole Bele @varsha_1966
रोजी
Nagpur

टिप्पण्या (2)

Similar Recipes