कुकिंग सूचना
- 1
बाजारातून ताजी कडक लाल डोक्याची सुरमई निवडून कोळी ताई कडून व्यवस्थित तिचे मध्यम आकाराचे तुकडे कापून आणावेत.
- 2
घरी ते सुरमईचे तुकडे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावेत
- 3
आता या तुकड्यांमध्ये आलं लसूण कोथिंबीर पेस्ट लाल तिखट मीठ हळद आणि कोकमाची रस एकत्र करून मॅरीनेट करून साधारण अर्धा तास मुरत ठेवावे
- 4
आता गॅसवर लोखंडी तवा मंद आचेवर तापत ठेवून त्यावर ३ टेबलस्पून तेल घालावे आणि एकीकडे मॅरिनेट केलेले सुरमाईचे तुकडे एक एक करून रव्याच्या सुक्या मिश्रणात घोळवावे
- 5
आता तांदूळ पिठी बेसन आणि रवा एकत्र करून घ्यावा
- 6
घोळवलेले तुकडे गरम तव्यावर थोड्या थोड्या अंतरावर सोडावेत आणि एक बाजू २-३ मिनिटं मंद आचेवर खरपूस तळून घ्यावी.
- 7
एक बाजू व्यवस्थित शिकली कि दुसरी बाजू शेकण्यासाठी अलगद पलटावी आंबी पुन्हा २-३ मिनिट खरपूस रंगावर सुरमई शॅलो फ्राय करून घ्यावी.
- 8
कुरकुरीत सुरमई फ्राय तव्यावरून प्लेट मध्ये काढून त्यावर बारीक चिरलेली ताजी कोथिंबीर घालून सजवून सर्व्ह करावी.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
क्रिस्पी सुरमई-पापलेट(crispy surmai paplet recipe in marathi)
#सीफूडसीफूड चॅलेंजच्या तिसऱ्या आठवड्याची थीम आहे, फिश स्टार्टर्स. या थीम साठी मी पोस्ट केले आहेत सुरमई आणि पापलेट यांची पारंपरिक फ्राय करायची रेसिपी. Suhani Deshpande -
सुरमई फ्राय
माझ्याकडे आवडीने खाल्ला जाणारा मासा म्हणजे सुरमई, फ्राय करा किंवा रस्सा मंडळी खुश आज तर सुरमई त गाभोळी मिळाली #सीफूड Madhuri Rajendra Jagtap -
बांगडो फ्राय
#सीफूडसर्व ठिकाणी पटकन सापडणारा मासा बांगडा . या मध्ये ओमॅगा -3 फॅटी ऍसिडनी भरलेल्या तीव्र चवदार मासा. Dhanashree Suki -
-
-
-
-
-
-
सुरमई फिश करी (surmai fish curry recipe in marathi)
#tmr#30minRecipechallengeफिशचे सर्वच प्रकार मला फार आवडतात ...😊 त्यातील सुरमई ही माझी खूप फेवरेट ,कैरी घालून हि फिश करी फार भन्नाट होते.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
-
चमचमीत सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
फिश फ्रायच्या अनेक प्रकारांपैकी माझ्या आवडीची फिश फ्राय...😋 Deepti Padiyar -
सुरमई फिश करी
#सीफूड सुरमई माशाची सोप्या पद्धतीची करी करणार आहोत भाताबरोबर खूप छान लागते Anita sanjay bhawari -
-
-
-
#सीफूड भरवा सुरमई फ्राय
मी पुर्णतः शाकाहारी आहे. पण "अहो" आणि मुलं ताव मारून नॉन व्हेज खातात आणि मत्स्यहार तर विशेष प्रिय. त्यामुळे त्यांच्यासाठी बनवायला शिकले. सुरमई आणि पापलेट आमच्या घरी सगळ्यांचे जीव की प्राण. त्यांच्यासाठी शिकलेल्या डिशपैकी भरवा फिश फ्राय ही माझी सिग्नेचर डिश. Suhani Deshpande -
मालवणी सुरमई मसाला फ्राय (malvani surmai masala fry recipe in marathi)
हि मालवणी सुरमई फ्राय चवीला,चमचमीत ,क्रिस्पी आणि मसालेदार लागते.तांदळाच्या भाकरी आणि मच्छीच्या सारासोबत तर आहाहा..😋😋चला तर,पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
-
-
मसालेदार सुरमई फ्राय (surmai fry recipe in marathi)
#EB11#W11"मसालेदार सुरमई फ्राय" Shital Siddhesh Raut -
-
-
सुरमई फ्राय (Surmai fry recipe in marathi)
#EB11#week11#विंटर_स्पेशल_रेसिपीज_ebook_चॅलेंज "सुरमई फ्राय" लता धानापुने -
कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय (Kombdi Vade Surmai Fry Recipe In Marathi)
#ASR आषाढ स्पेशल रेसिपीज साठी मी आज माझी कोंबडी वडे आणि सुरमई फ्राय ही रेसिपी पोस्ट करत आहे. Mrs. Sayali S. Sawant. -
-
मालवणी सुरमई फिश फ्राय आणि करी (FISH CURRY RECIPE IN MARATHI)
#फॅमिलीइंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मी आमच्या अहोंसाठी बनविलेली खास डीश. त्यांना फारच आवडली !!!खरंतर माझी आई मालवणातली आणि माझे बाबा वाणगाव (डहाणू) चे, त्यामुळे आम्हाला दोन्ही बाजूंची चव चाखायला मिळायची...बाबांना फिश सोबत चिंच कढी लागायची तर आईला ही करी...!! मग काय फिशच्या दिवशी आमची चंगळ असायची कारण आम्हा मुलांना दोन्ही चवी एकत्र मिळायच्या.!! माझ्या बाबांना असे फिश फार आवडायचे..आणि सोलकढी सुद्धा! माझ्या हातच बाबांना खाऊ घालण्याआधीच बाबा.......:(असो तर ही मालवण ची स्पेशल डीश बरका!!!...ही माझ्या आईने मला शिकविलेली, माझ्या आजीने आईला शिकवलेली , आजीला पणजीने.....!!!!!सांगायचा मुद्दा असा की ही पारंपारिक आहे आणि टेस्टी आहे. आजी म्हणायची की तीची आई म्हणजेच माझी पणजी सगळा मसाला पाट्यावर वाटायची. तेल न घालताच मातीच्या भांड्यात ही करी चुलीवर बनवायची!आजी म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आई म्हणायची "माझ्या पेक्षा माझ्या आईच्या हाताला चव आहे". आम्हाला तर आजीच्या हातच आणि आईच्या हातच दोन्ही सारखेच वाटायचे..पण आता कळाले की आपल्या पेक्षा आपल्या आईच्या हाताला किती चव असते ती!!!!!पण अहोंना फारच आवडल्या मुळे मी मात्र खूष होते. Thank you कुकपॅड तुमच्यामुळे आणि इंटरनॅशनल फॅमिली डे च्या निमित्ताने मला ही संधी मिळाली. Priyanka Sudesh
More Recipes
टिप्पण्या