कुकिंग सूचना
- 1
सर्वप्रथम बाजारातून सुरमाईचे तुकडे आवडीनुसार कापून आणा.घरी आणून स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी.
- 2
संकेश्वरी मिरच्या कोमट पाण्यात १०-२० मिनिट भिजत ठेवावी
- 3
वाटण्यासाठी कांदा टोमॅटोच्या फोडी करून घ्याव्या आलं लसूण सोलून घ्यावं खोबरं खोवून घ्यावं
- 4
मिरच्या पाण्यातून उपसून घेऊन सर्व वाटणाचं साहित्य एकत्र बारीक वाटून घ्यावं
- 5
फकडणीतही कढईत तेल घालून तापत ठेवावं दोनच सर्व साहित्य तयार ठेवावं
- 6
तेल गरम झाल्यावर लसूण कढीपत्ता कांदा कोकम आणि वाटण घालून तेल सुटेपर्यंत परतून घ्यावं मग मासे घालून पाणी घालून उकळी येईपर्यंत शिजवावे
- 7
गरमा गरम कालवण वाफाळत्या भातासोबत आज चपाती किंवा भाकरी सोबत खायला सर्व्ह करावं.
कूकस्नप्स
ते कसे गेले? कुकस्नॅप शेयर करुन या कृतीची शिफारस करा!
Similar Recipes
-
-
-
🍤 चिंगळांच कालवण सोबत सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#AV मूळची रत्नागिरीकर असले तरी आयुष्यातली महत्वाची वर्षं सिंधुदुर्ग मध्ये गेली आहेत माझी. त्यामुळे नाही म्हटलं तरी जिभेवर सिंधुदुर्ग मधल्या चवीचा पगडा बसला आहे, त्यामुळे शाकाहार असो की मांसाहार - खोबऱ्याचा सढळ हस्ते वापर केल्याशिवाय दिवस जात नाही माझा 🤓चिंगळांमध्ये calories खूप कमी असतात आणि चांगलं cholesterol भरभरून असतं. त्यामुळे खाताना अजिबात वाईट वाटून घ्यायचं नाही, अगदी आडवा हात मारायचा 😍मग काय, या चिंगळांवर ताव मारायला तयार होऊया??!! 😆😀🤤 सुप्रिया घुडे -
-
बांगडा करी
#सीफूडबांगडा करी खूप वेगवेगळ्या पद्धतीने केल्या जातात येथे आज अगदी लवकर होणारी आणि चविष्ट अशी पद्धत वापरून बांगडा करी केली आहे वर घातलेल्या कांद्याने खूप छान चव आली आली आहे Aarti Nijapkar -
-
सुरमई करी
#सीफूड week 2फिश खाणार्यांना कोणत्याही फिशची चमचमीत करी म्हणजेच माशाची आमटी खाण्याची इच्छा झाली की लगेचच बाजारात जाऊन मासे आणून साफ करुन कधी एकदा माशांची आमटी आणि भात खातोय असं होऊन जातं. ही आवड आमच्या कडे पण जोपासली आहे. आपल्या सगळ्यांच्या आवडीच्या सुरमई माशाच्या आमटीची रेसिपी देत आहे. ही गरमागरम फिश करी गरम भाताबरोबर खाणे म्हणजे मत्स्य प्रेमींसाठी पर्वणीच असते Ujwala Rangnekar -
आई च्या हातचे - वाटपाचे कोकम सार (kokam saar recipe in marathi)
#MDसोलकढी पेक्षाहि मला हे वाटपाचे कोकम सार खूप आवडीचं. मी होस्टेलहून घरी आले कि आई खास माझ्यासाठी करायची. मग जे काही २-३ दिवस मी घरी असेन तेवढे दिवस सकाळ-संध्याकाळ पदार्थांची रेलचेल असायची. मग बाबा आणि बहीण बोलायचे - "सुप्रिया घरी आली कि एवढे पदार्थ आम्हाला वासाला तरी मिळतात" :D त्यावर आई चिडून बोलायची - "हो ना, जसं काय तुम्हाला उपाशीच ठेवतेय :-P ती नावं न ठेवता आवडीने खाते, तिथे हॉस्टेल ला काय मिळणार एवढं सगळं, म्हणून तिच्यासाठी बनवते :-* "आता मी गावी गेले कि माझी काकी माझासाठी असं सार बनवते - बस्स मला आवडतं म्हणून :)तर आज Mother's Day Special - आई ची आठवण म्ह्णून मी पहिल्यांदा असं सार बनवलं, काकी ला विचारून... आई बनवायची किंवा काकी बनवते तशी चव तर आलेली आहे :) सुप्रिया घुडे -
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी #कढीसोलकढी किंवा कोकम कढी ही आमसुलं किंवा कोकम पासून बनविण्यात येणारी कोकणातील प्रसिद्ध अशी आहे. पारंपारिक असल्यामुळे अर्थातच आई कडून शिकली. अत्यंत पौष्टिक आणि पित्तनाशक अशी ही आहे.घरात मासे, चिकन किंवा मटणाचा बेत असेल तर हमखास सोल कढी करण्यात येते. सोलकढी म्हणजे, ताकासाठी असलेला पर्याय असं म्हटलं तरिही वावगं ठरणार नाही. यासाठी कोकम आणि खोबऱ्याच दूध या पदार्थांची गरज असते. खरं तर सोलकढी तुम्ही नुसतीच पिऊ शकता किंवा भातावरही खाऊ शकता.उन्हाळ्यातही सोलकढी अत्यंत फायदेशीर ठरते. यामध्ये वापरण्यात येणारं कोकम आणि नारळाच्या दूधामध्ये निसर्गतः थंड गुणधर्म असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देण्यासाठी सोलकढी उत्तम ठरते.ही झटपट व्हावी म्हणून तूम्ही नारळाच्या दुधात कोकम सिरप घालून छान सोलकढी बनवतातच. पण अशी पारंपारिक आणि पित्तनाशक अशी ही सोलकढी नक्की ट्राय करा! Priyanka Sudesh -
डाळींब्या (बिरड्या) भात (Dalimbi Bhat Recipe In Marathi)
माझ्या आईची स्पेशालिटी आहे हि रेसिपी. कोणीही आमच्या घरी जेवायला येणार असेल तर या पदार्थाची डिमांड असतेच. नक्की करुन बघा. Prachi Phadke Puranik -
अळुवडी (aloo wadi recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5अळुवडी ही महाराष्ट्र आणि गुजरात मध्ये खूप प्रसिद्ध आहे.पावसाचा एकच जोरदार शिडकावा झाला की घराच्या आवारात-शिवारात अळुचं बनच्या बन लसलसायला लागतं. सुरुवातीला लहानुली असलेली पानं थोड्याच दिवसात हाताच्या पशाला मागे टाकतात...!अळूची पाने दोन प्रकारची असतात. ज्या पानांचे दांडे आणि देठ काळपट रंगाचे असतात ती पाने अळुवडीसाठी वापरतात. भाजीचा अळू आणि वडीचा अळू अशी साधारण वर्गवारी केली जाते.खूप तंतुमय पदार्थ असल्यामुळे वजन कमी करणाऱ्यांसाठी किंवा मधुमेही लोकांसाठी अळू अतिशय उपयुक्त आहे. A, B6 आणि C जीवनसत्वे यामध्ये खूप प्रमाणात असतात.पावसाळ्यात पाऊस असो वा नसो कोकणातल्या जमिनी पाणथळ असल्यामुळे जमिनीतल्या पाण्यावर अळू वाढत राहातो. गणपतीला नेवैद्यात अळूवडीला विषेश स्थान आहे. मी मालवणी पद्धतीच्या अळुवडीची रेसिपी शेअर करत आहे. नक्की ट्राय करा!!! Priyanka Sudesh -
-
भेंडीचे कुवळ (bhendiche kuval recipe in marathi)
#KS1#कोकणअस्सल कोकणातील मालवणी पद्धतीचे भेंडीचे कुवळ ही रेसिपी जरूर करून बघा, अश्याच प्रकारे टोमॅटोचा सारही करतात फक्त त्यात मग भेंडी घालत नाही. Deepa Gad -
हिरव्या मसाल्यातलं कोलंबीचं कालवण
#सीफूडहिरवा मसाला म्हणजे नैसगिर्क चवीचं भांडार.ताजी कोलंबी हिरव्या मसाल्यात तिची चव खुलवते.हिरव्या मिरच्या,आले ,लसूण आणि कोथिंबीर इतकाच हिरवा मसाला एकदम चवदार असतो,पण जोडीला कांदापात घालून उत्तम चवबदल होतो.शंका वाटत असली तर ही पाककृती करूनच पहा.एकदा केलीत तर पुन्हा पुन्हा कराल. नूतन सावंत -
बांगड्याचे तिखले
#सीफूडनमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना......अहो खाल्लेच पाहिजे......तर मंडळी आज आपण बांगडा हा मत्सप्रेमींचा आवडता मासा शिजवणार आहोत.चवीला अतिशय उत्कृष्ट अश्या माशाबद्दल ची मला माहित असलेली थोडीशी माहिती मी इथे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे.या माशाला अंजारी असेही म्हणतात.या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.बांगडा हा मासा उष्ण असतो.बोंबलानंतर बांगड्याला कॅल्शिअमचा स्रोत म्हणून ओळखला जाते.याशिवाय,ओमेगा ३ व प्रथिने, जीवनसत्त्व ‘ड’ व ‘क’ हे घटकही बांगडय़ात असतात.बांगडा भाजून खाण्यापेक्षा आमटीतून शिजवून खाल्ल्यास त्यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात टिकून राहते...चला तर मंडळी आज आपण बनवूया झणझणीत, चमचमीत असे " बांगड्याचे तिखले " Anuja Pandit Jaybhaye -
फरसबीची तळासणी (Farasbi Chi Bhaji Recipe In Marathi)
#BR2 फरसबी ही एक अशी भाजी आहे की जी सर्वांना आवडते आणि खूप डिशमध्ये हिचा उपयोग करता येतो. व्हेज कुर्मा, पुलाव, कोशिंबीर, सुकी भाजी, कटलेट्स ,टिक्की सर्व ठिकाणी चालते .अशी ही एव्हरग्रीन भाजी आज आपण अगदी कमी साहित्यात पण तितकीच चविष्ट अशी करून बघूया. ही रेसिपी मंगलोरी आहे Anushri Pai -
फिश करी (fish curry recipe in marathi)
#डिनर#साप्ताहिक डिनर चॅलेंज#मालवणी (प्रॉनस करी) Deepali Bhat-Sohani -
सुरमई कांदा, सुरमई फ्राय आणि सोलकढी (surmai kanda and solkadhi recipe in marathi)
#GA4#week18#fishफिश हा clue ओळखून मी भरपूर कांदा घालून केलेलं सुरमईच सुकं आणि सुरमई फ्राय केलेत, कमीत कमी वेळात आणि झटपट होणारी अशी ही रेसिपी आहे. Deepa Gad -
मुशी मसाला
#सीफूड#एनीफिशकरीआज मी मुशी म्हणजेच मला वाटतं त्या माश्याला शार्क मासा म्हणतात त्याची करी बनविली आहे. मालवणीमध्ये म्होरीचा म्हावरा म्हणतंत. बघा तुम्हाला आवडते का...... Deepa Gad -
सुरमई फिश करी
#सीफूड सुरमई माशाची सोप्या पद्धतीची करी करणार आहोत भाताबरोबर खूप छान लागते Anita sanjay bhawari -
सुरमई फ्राय
माझ्याकडे आवडीने खाल्ला जाणारा मासा म्हणजे सुरमई, फ्राय करा किंवा रस्सा मंडळी खुश आज तर सुरमई त गाभोळी मिळाली #सीफूड Madhuri Rajendra Jagtap -
-
घेवड्याची भाजी (Ghevdyachi Bhaji Recipe In Marathi)
थंडीमध्ये खूप प्रकारचा घेवडा मिळतो.प्रत्येकाची चव थोड्याफार प्रमाणात सारखी असते.हा जो घेवडा आहे,थोडा चपटा असतो.शिजल्यावर मउ होतो.आज मॅंगलोरी प्रकारची भाजी आपण पाहूया. Anushri Pai -
भंडारी पद्धतीचे कवटाचे कालवण.(अंड्याचे कालवण) (andayche kalwan recipe in marathi)
#रेसिपीबुक #week5पावसाळी हवेत गरमागरम जेवणाची चव काय वर्णावी?माझ्यासारख्या गरम गरम जेवायला आवडणाऱ्या आणि एरवी थंड जेवण घेणाऱ्यानाही पावसाळ्यात गरम जेवणाची ऊब हवीहवीशी वाटतेच.या काळात मासे मिळत नसल्याने खायच्या वारी सुक बाजार किंवा अंडी,कोंबडी यावर भर दिला जातो.त्यातून या थंड हवेत उष्ण पदार्थ खायचे म्हणजे आतूनही ऊब राहते आणि शरीराला ऊर्जा मिळते.म्हणून माझी आई खास पावसाळा आणि थंडीत आवर्जून हे गरम मसाल्याचे कालवण, ताजा मसाला वाटून ,तोही पाट्यावर वाटून करत असे. कवटं म्हणजे अंडी तर घरचीच असत.त्यामुळे ताजी असत.चटकन होणारे हे कालवण उकळू लागले की त्या पावसाळी हवेत असा खमंग दरवळ पसरत असे की,कधी एकदा जेवायला बसतो असं व्हायचं.अंडी उकडून ग्रेव्हीत सोडणे ही पद्धत उत्तरेकडे तशीच दक्षिणेकडेही दिसते,पण अंडी फोडून डायरेक्ट उकळत्या कलवणाच्या कढात सोडणं आणि शिजवणं ही मात्र अस्सल कोकणी पद्धत. सवय नसेल किंवा अंडी ताजी नसतील तर एक एक अंडे फोडून वाटीत घेऊन मग कढात सोडायचं नाहीतर डायरेक्ट कलवणातच अंडं फोडून सोडायचं,जसं हाफ फ्रायसाठी तव्यावर फोडतो तसं.उकळत्या कढात सोडल्यामुळे अंडं लगेच शिजू लागून सेट होतं आणि मसाला आतपर्यंत मुरतो.त्यामुळे अंड्यालाही झकास चव लागते.दुसरं म्हणजे अंडं फोडताना थो s डीशी काळजी घेतली पाहिजे कारण पिवळा बलक अखंड राहिला पाहिजे,म्हणजे तो छान गोलकारातच सेट होतो,नाहीतर त्याच्या चिंध्या चिंध्या होतात.म्हणजे चव काही बिघडत नाही पण दिसायला बरं नाही दिसत,इतकंच.मीही कधी कधी पाट्यावर वाटून हे कालवण करते.तेव्हा आईच्या आठवणीनी ते जास्तच चवदार लागतं.चला तर, घ्या तर साहित्य जमवायला. नूतन सावंत -
-
कोकण स्पेशल, चमचमीत फिश थाळी (fish thali recipe in marathi)
#KS1कोकणात झणझणीत आणि चमचमीत पदार्थांवर ताव नाही मारला, तर नवलच म्हणावे. समुद्र मासळींचे विविध प्रकार, त्यातही प्रत्येक जिल्ह्याप्रमाणे बनवायची पद्धत वेगळी, काही ठिकाणी रवा लावून, तर काही ठिकाणी तांदळाचे पीठ लावून. तिथली कालवणंही एकदम चवदार. नारळाचा कालवणामध्ये सढळ वापर. कोथिंबीर, लसूण लावलेले वाटण. मसाल्यांचा वापर मात्र जेमतेमच. मसाला वापर कमी असला, तरी पदार्थ खूप रुचकर होतात ही कोकणी पदार्थांची खासियत. मालवणी कोंबडी वडे, खेकडे, तिसरे, माशांचे तिखलं म्हणजे नॉनव्हेज खाणाऱ्यांसाठी मेजवानीच. फक्त मांसाहारीच नाही, तर शाकाहारी पदार्थही कोकणात तितकेच सुग्रास लागतात. त्यात ओल्या काजूची उसळ, कुळथाची पिठी, जिभेचे लाड पुरवण्यासाठी जांभूळ, आमसूल वापरून केलेल्या चटपटीत चटण्या..😋😋माझ्या सासरी आणि माहेरी सगळेच अस्सल नाॉनव्हेज खवय्ये आहेत .दर रविवारी आमच्याकडे फिश थाळी बनते .त्यातील एक माझी आणि माझ्या कुटुंबाची आवडती फिश थाळी सादर करीत आहे.पाहूयात रेसिपी. Deepti Padiyar -
बांगड्याचे तिखले (bangdyache tikhale recipe in marathi)
नमस्कार मंडळी 🙏चवीचे खाताय ना......अहो खाल्लेच पाहिजे......तर मंडळी आज आपण बांगडा हा मत्सप्रेमींचा आवडता मासा शिजवणार आहोत.चवीला अतिशय उत्कृष्ट अश्या माशाबद्दल ची मला माहित असलेली थोडीशी माहिती मी इथे सांगण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे...बांगडा (इंग्रजीत Mackerel) हा एक खाऱ्या पाण्यातला मासा आहे. भारताभोवतालच्या समुद्रांत हा मुबलक मिळतो.हा मासा शाकाहारी आहे.या माशाला अंजारी असेही म्हणतात.या माशाचे शास्त्रीय नाव बहुधा Sromber srombus असावे.बांगडा हा मासा उष्ण असतो.बोंबलानंतर बांगड्याला कॅल्शिअमचा स्रोत म्हणून ओळखला जाते.याशिवाय,ओमेगा ३ व प्रथिने, जीवनसत्त्व ‘ड’ व ‘क’ हे घटकही बांगडय़ात असतात.बांगडा भाजून खाण्यापेक्षा आमटीतून शिजवून खाल्ल्यास त्यातील ओमेगा ३ फॅटी अॅसिड अधिक प्रमाणात टिकून राहते...चला तर मंडळी आज आपण बनवूया झणझणीत, चमचमीत असे " बांगड्याचे तिखले "Anuja P Jaybhaye
-
-
-
सोलकढी (solkadhi recipe in marathi)
#फोटोग्राफी#कढीही कोकणातील खास रेसिपी, मांसाहारी जेवण असेल तर ही सोलकढी हमखास बनतेच. Deepa Gad
More Recipes
https://cookpad.wasmer.app/in-mr/recipes/11751858
टिप्पण्या